अनिल कुमार लाहोटी  sakal
पिंपरी-चिंचवड

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची चिंचवड रेल्वे स्थानकाला भेट

चिंचवड प्रवासी संघाने पुणे लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्‍न सोडविण्याबाबत निवेदन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी शुक्रवारी (ता.3) चिंचवड रेल्वे स्थानकाला अचानक भेट दिली. या स्थानकावरील विकासात्मक कामांची पाहणी करून कामगिरीचा आढावा घेतला. रेल्वेची पायाभूत कामे, मालवाहतूक आणि कोचिंग कामगिरीसंबंधी माहिती घेतली. दरम्यान, चिंचवड प्रवासी संघाने पुणे लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्‍न सोडविण्याबाबत निवेदन त्यांना दिले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी महाव्यवस्थापकांना चिंचवड रेल्वे स्थानकात केलेल्या आरक्षण केंद्र, पश्चिमेच्या बाजूला तिकीटघर, नवीन पादचारी जिना, प्लॅटफॉर्मची रुंदी अशा विकासात्मक कामांची, वाहतुकीच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाविषयी तसेच वक्तशीरपणा, मालवाहतूक, एक्स्प्रेस, विशेष गाड्या, मालगाड्या त्यांची कामगिरी माहिती दिली.यावेळी मध्यरेल्वे विभागाच्या झेड.आर.यु.सी.सी. च्या सदस्या उमा खापरे उपस्थित होत्या. चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, नंदू भोगले, नारायण भोसले, मुकेश चुडासामा, हार्दिक जानी, नयन तन्ना, मनोज पंजाबी, दिलीप कल्याणकर, निर्मला माने, दादासाहेब माने, सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. पौर्णिमा कदम आदी पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी समवेत लेखी निवेदन व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. दरम्यान खापरे यांनी देखील चिंचवड प्रवासी संघाच्या मागण्याची योग्य दखल घ्यावी, अशा सूचना महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांना केल्या.

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार

पुणे-लोणावळा दरम्यान ४ युनिट लोकल गाड्या दिवसभरात ४२ फेऱ्या करतात.एक्स्प्रेस गाड्या, मालवाहतूक, लोकल तिकीटांतून केंद्रीय रेल्वे खात्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. नागरिकांना सुविधा मात्र आज मिळत नाही. पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढीसाठी चिंचवड प्रवासी संघाकडून १९८९ सालापासून प्रयत्न सुरू आहेत, पण निधी उपलब्ध झाला नाही, महापालिका व राज्य शासनाने २०२० सालापासून रेल्वे विभागाला आवश्यक निधी ५ ते १० टक्के एकूण खर्चाच्यापैकी देण्याची दिसून आली नाही. त्यामुळे पुणे लोणावळा दरम्यान रखडलेले चौपदरीकरण रेल्वे मार्गाचे काम आज मार्गी लागले असते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील खासदार, आमदारांनी देखील हव्या त्या प्रमाणात पाठपुरावा केला नाही. रेल्वे विभाग देखील दोन्ही महापालिकेचे ६२५ कोटी रुपये तसेच, राज्य शासनाचा निधी न मिळाल्यामुळे पुणे-लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्‍न सुटू शकला नाही. पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या एक लाखांहून अधिक प्रवासीयांची ससेहोलपट होत असून त्यांचा वेळ, पैसा, शारीरिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

या आहेत मागण्या

  • अजमेरला जाणारी एक्स्प्रेस गाडीला चिंचवडला थांबा मिळावा.

  • पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस थांबा मिळाला पाहिजे.

  • भाविकांसाठी पुणे ते हरिद्वार नवीन एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात यावी.

  • पूर्वेच्या दिशेला नोंदणीकृत रिक्षा थांबा असावा.

  • रेल्वे पास आरक्षण पुस्तिका चिंचवड येथे उपलब्ध करावी.

  • सिंहगड एक्सप्रेसला पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT