पिंपरी-चिंचवड

जर्मनी, जपान, अमेरिकेला तळेगाव-चाकणची भुरळ!

सुधीर साबळे

पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे थंडावलेल्या अर्थचक्राला गती मिळावी, म्हणून देशातील अनेक राज्ये विदेशी गुंतवणुकदारांना आपल्याकडे येण्याचे निमंत्रण देत असले तरी जर्मनी, जपान आणि अमेरिकेत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना मात्र, गुंतवणूकीसाठी महाराष्ट्रातील तळेगाव आणि चाकण परिसराची भुरळ पडली आहे. याठिकाणी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात अनेक उद्योगांना स्वारस्य असून, त्यासंदर्भात एमआयडीसीकडे विचारणा सुरू असल्याने पुढील वर्षात आणखी नव्या विदेशी कंपन्यांची भर पडणार आहे. 

सद्य:स्थिती काय?

एमआयडीसीकडून तळेगावमधील टप्पा चारमध्ये औद्योगिक विकासासाठी 2200 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सध्या त्याठिकाणी जमिन मोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे, जमिन ताब्यात घेणे, औद्योगिक भूखंडाचे नियोजन करणे यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा अवधी जाणार आहे. त्यानंतर नव्या उद्योजकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षामध्ये याठिकाणी ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विदेशातील कंपन्या गुंतवणूक करू शकतील. याखेरीज चाकणमधील टप्पा पाचमध्ये देखील 637 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 200 हेक्‍टर क्षेत्र ताब्यात आले आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत याठिकाणची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यानंतर उद्योजकांना त्याचे वाटप सुरू होणार आहे. प्रामुख्याने ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना इथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची इच्छा आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारणांसाठी इथे गुंतवणुकीला प्राधान्य...

पुणे आणि परिसरातील चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे असल्यामुळे इथे उत्तम शैक्षणिक सुविधा आहेत. त्यामुळे उद्योगांना आवश्‍यक असणारे कुशल मनुष्यबळ याठिकाणी सहजपणे उपलब्ध होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई अवघ्या चार तासांच्या अंतरावर आहे. पुण्याजवळील पुरंदर परिसरात नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम सुरू आहे. तळेगाव, चाकण परिसरात रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्याचा उद्योगांना फायदा होऊ शकतो. या औद्योगिक परिसरातील वातावरण चांगले आहे. त्यामुळेच विदेशातील कंपन्या इथेच गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चाकण आणि तळेगावमध्ये गुंतवणूक करण्यास विदेशातील अनेक कंपन्या इच्छुक आहेत. आतापर्यंत जर्मनी, जपान, अमेरिका या देशातील कंपन्यांनी इथे गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलेले आहे. तळेगावमधील टप्पा दोनमध्ये 800 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून, त्याठिकाणी काही जागा विदेशातील कंपन्यांना उत्पादन प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. तळेगावमधील टप्पा चार आणि चाकण भागातील टप्पा पाचमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 
- अविनाश हदगल, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT