Mask Sakal
पिंपरी-चिंचवड

औषध दुकानदारांकडून शासनाच्या अध्यादेशालाच केराची टोपली

मास्कच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे शासनाने उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही ‘कॉस्ट ऑडिटर’ यांच्या साहाय्याने निर्धारित केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना (Corona) प्रादुर्भावावर प्रतिबंधक म्हणून मास्क (Mask) महत्त्वाचा घटक आहे. या मास्कची किंमत (Rate) निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मिळावा यासाठी शासनाने राज्यात एन-९५ मास्क १२ ते १९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध करून दिला. शिवाय, उपलब्ध मास्कचा फलक किमतीनुसार औषध दुकानांचा बाहेर लावण्याचे निर्देशही दिले. परंतु याबाबतचा ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने ‘रिॲलिटी चेक’ केला असता १२ रुपयांचा ‘एन ९५’ मास्क कुठे ३० तर कुठे ४० रुपयांत मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. किमतीचे फलकही कुठेच आढळून आले नाहीत. (Government Ordinance was Slammed by Drug Dealers)

मास्कच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या. यामुळे शासनाने उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही ‘कॉस्ट ऑडिटर’ यांच्या साहाय्याने निर्धारित केली. मास्कच्या निर्धारित दराबाबत अध्यादेशही काढले. परंतु काही औषध विक्रेते हव्यासापोटी शासनाच्या अध्यादेशालाच केराची टोपली दाखवीत असल्याचे चित्र आहे.

संत तुकाराम येथील मेडिकल स्टोअर्सला भेट दिली असता ‘प्रिसमास्क एन-९५’ हे २१४ रुपये किमतीचे मास्क १५० रुपयांत दिले. थ्री लेअर मास्क ८ रुपयांत दिले. टू लेअर मास्क पाच रुपयात विकतात.

मासुळकर कॉलनीतील जेनेरीक औषधी दुकानातून एन-९५ मास्क ज्यावर किंमत १२५ रुपये होती ते ४० रुपयांमध्ये दिले. थ्री लेअर मास्क आठ रुपयांत तर टू लेअर मास्क चार रुपयांत दिले. एवढ्या कमी किमतीत मास्क मिळत असल्याचे म्हटल्यावर अनेक जण स्टोअर करून ठेवतात, म्हणून बाहेर किमतीचा फलक लावलेला नाही.

काळेवाडीत एका मेडिकल स्टोअर्समध्ये मास्कच्या किमतीबाबत अक्षरशा: ग्राहकांची लूट असल्याचा अनुभव आला. येथे १९ ते ४९ रुपयात मिळणारे एन ९५ मास्क चक्क १०० रुपयांना असल्याची माहिती फार्मसीस्टने दिली. तर थ्री लेअरचे मास्क १६ रुपयांना तर टू लेअर मास्क ६ रुपयांना विकण्यात येत होते. आता किमती कमी झाल्यामुळे फलक लावण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

‘शासनाच्या दरानुसारच औषध विक्रेत्यांनी मास्कची विक्री करायला हवी. त्यापेक्षा जास्त दरात मास्क विकले जात असतील आणि तसे पुरावे असतील तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. लवकरच शहरातील औषध विक्रेत्यांची तपासणी केली जाईल.’

- एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

अशी होतेय मास्क विक्री

मास्क प्रकार - शासनाचे निश्‍चित दर - प्रत्‍यक्ष विक्री

-व्हीनस सीएन - एन ९५ कप शेप-२९ - ४० ते ६० रुपये

-मगनम एन ९५ एमएच कप - ४९ - १००

-एन ९५ व्ही शेप - १९ - ३०

-एफएफपी मास्क -१२ - ३५

-तीन पदरी सर्जिकल मास्क- ४ - १२ रुपये

-दोन पदरी सर्जिकल मास्क-३ - ६ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT