Dr Shripal Sabnis Sakal
पिंपरी-चिंचवड

असंघटित लोकांना काहीच न देणारे सरकार पुरोगामी विचारांचे आहे काय?

आकुर्डी येथे शनिवारी ‘पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन’ झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी येथे शनिवारी ‘पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन’ झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

पिंपरी - महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार (Government) आहे. ते आमदारांना (MLA) घरे देतात, त्यांचे भत्ते (Allowance) वाढवतात. मात्र, असंघटित लोकांना काहीच न देणारे हे सरकार खरंच पुरोगामी विचारांचे आहे काय?, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी केला.

आकुर्डी येथे शनिवारी ‘पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन’ झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्रमशक्ती भवन येथे कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांनी संयुक्तपणे याचे आयोजन केले होते. दिवसभर सुरू राहणाऱ्या या संमेनात मुलाखत, कवी संमेलन असे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे उदघाटन कष्टकऱ्यांच्या अवजारांचे पूजन करून करण्यात आले.

सबनीस म्हणाले, ‘विद्यमान आधुनिक औद्योगिक समाजात संघटित कामगारांचा दबावगट आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या मोठ्या संघटना आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटले आणि सुटतात. परंतु असंघटित कष्टकरी समाजाच्या समस्या प्रलंबित राहतात. कारण त्यांच्या वेदना मोठ्या असूनही त्यांच्या छोट्या आणि वेगवेगळया संघटना आहेत. या असंघटीत श्रमिकांमध्ये ३२ टक्के महिला आहेत. शहरामध्ये ७७ टक्के बायकांना, मजूरांना स्वतःचे घर नाही. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आहे असे म्हटले जाते. मात्र असंघटित लोकांना काहीच देत नाही. त्यामुळेच प्रश्न पडतो हे सरकार पुरोगामी विचारांचे आहे? संपत्ती निर्मितीमध्ये सर्वात जास्त असंघटित आहेत, त्यांना आरोग्याच्या पूर्ण सुविधा नाहीत. मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी त्यांची आर्थिक कुवत नाही. कामगारांच्या कष्टाला धर्म नसतो, पण त्यांच्या घामाचे मूल्यांकन करून सरकारने त्यांना किमान समृद्ध जीवनासाठी विशेष व्यवस्था करावी.’’

घामाची संस्कृती आणि ऐतखाऊंची संस्कृती यातील भेद केव्हा संपणार? प्रत्येक युगात श्रमिक गरीब का राहिले? असे सवाल करत सबनीस म्हणाले, ‘श्रमिकांचे रक्त आणि घाम समाजाच्या निर्मितीच्या सृजनसोहळ्यात समर्पित झालेले आहेत. कष्टाची भाकरी खाणारा कामगार संस्कृतीशी इमान राखतो. कामगारांच्या कष्टाला धर्म नसतो,तो इमानदार माणसांचा गोतावळा आहे, तरीही तो प्रत्येक युगात गरीबच का राहतो? त्याची उपेक्षा थांबत नाही. त्यांना किमान सुखाचे दिवस आले नाहीत. त्यामुळे समाजात ऐतखाऊंची संस्कृती आणि घामाची संस्कृती स्पष्ट दिसते. १२ व्या शतकात बसवेश्वरांनी,संत तुकाराम महाराजानी त्या काळच्या समाज व्यवस्थेत घाम गाळणाऱ्या श्रमिकांची दुःखे व्यक्त केली, शिवाजी महाराजांनी श्रमिक रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्तीसाठी लढाई केली. कष्टकरी साहित्य संमेलनातून त्यांच्या वेदना,दुःख शब्दबद्ध होईल,त्याच्या मुखातून जे गीत गायले जाईल, त्या गीताचा, कवितेचा आशय राजदरबारी कळावा. श्रमाचे मूल्य गांधी, महात्मा फुले, बसवेश्वर, कार्ल मार्क्स, आंबेडकर यांच्या पर्वाने सन्मानित केले आहे. तेव्हा बुद्धीच्या कौशल्यावर श्रमिकांच्या घामाची संस्कृती विकसित व्हावी.’’

यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, प्रमुख निमंत्रक पुरूषोत्तम सदाफुले, प्रमुख पाहुणे रंगनाथ गोडगे, शिवाजीराव खटकाळे, जेष्ठ कामगार नेते सुदाम भोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT