Gun Firing sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Crime : गोळीबारामुळे शहरात दहशतीचे सावट; पिस्तूलजप्तीच्या कारवाईत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बेकायदा पिस्तुले बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करून पिस्तुले जप्त केली जात आहेत. मात्र, तरीही बेकायदा पिस्तुलांतून गोळ्या झाडून हल्ल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पाठोपाठ घडत आहेत.

महिनाभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. भररस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराचा कानठळ्या बसवणारा आवाज व त्यामुळे निर्माण होत असलेल्या दहशतीमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

उद्योगनगरीत दर दोन-चार दिवसांनी कुठेना कुठे तरी पिस्तूल जप्तीची कारवाई केली जाते. पाठोपाठ होत असलेल्या कारवाईवरून गुंडांना सहजरीत्या पिस्तूल उपलब्ध होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हल्ल्याच्या घटनांमध्येही पिस्तुलाचा वापर वाढला आहे.

दहशत माजविण्यासाठीही पिस्तूल बाळगणारे अधिक असल्याचे पिस्तूल जप्तीच्या कारवाईवरून दिसून येत आहे. या प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

तसेच पिस्तूल कुठून येतात, याचा मुळापर्यंत शोध घेणे आवश्यक आहे.

शस्त्रे जमा असताना गोळीबार !

निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांकडून तडीपार, मोका, स्थानबद्ध, प्रतिबंधात्मक कारवाईसह शस्त्र जप्त करण्यावर अधिक भर दिला जातो.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनीही विविध शस्त्रे जप्त केली. पिस्तुलेही जप्त केली. मात्र, तरीही निवडणूक आचारसंहिता काळातच घडलेल्या गोळीबाराच्या घटनांनी शहर हादरले.

सव्वा महिन्यात तीन गोळीबार

२३ एप्रिल : जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलासह तिघांनी केलेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची घटना तळेगाव-दाभाडे येथे घडली. यामध्ये २७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.

१२ मे : चिखली, जाधववाडी येथील पंतनगर रोडवर व्यावसायिक वादातून गोळीबार झाला. यामध्ये पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्याने दोन जण गंभीर जखमी आले.

२९ मे : नवी सांगवी येथे पूर्ववैमनस्यातून एकावर भररस्त्यात दोन गोळ्या झाडून खून करण्यात आला.

महिनाभरातील पिस्तूलजप्ती

  • १ मे : तळेगाव दाभाडे येथे दोन पिस्तुले जप्त, चिखलीत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

  • २ मे ः चिखलीत एक पिस्तूल जप्त

  • ४ मे ः निगडीत एक पिस्तूल जप्त

  • देहूरोडमध्ये एक पिस्तूल जप्त

  • ८ मे : पिंपरीत एक पिस्तूल जप्त

  • ११ मे : वाकडमध्ये एक पिस्तूल जप्त

  • २५ मे : हिंजवडी येथे एक पिस्तूल जप्त

  • २५ मे : सूस येथे एक पिस्तूल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT