पिंपरी-चिंचवड

सीबीएसई परीक्षेत हर्षवर्धन येवलेला ९८.४० टक्के

CD

पिंपरी, ता.१५ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक (१०वी) वर्गाचा निकालही जाहीर केला आहे. त्यामध्ये, सिटी प्राइड स्कूल, निगडीच्या हर्षवर्धन येवले याने ९८.४० टक्के गुण मिळविले. याखेरीज, रावेतच्या एस.बी.पाटील स्कूलच्या अनिरुद्ध गुप्ता (९८.६ टक्के), धवल पाटील (९८ टक्के) आदींनी घवघवीत यश मिळविले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ माध्यमिक (इ.१२ वी) वर्गाच्या निकालापाठोपाठ इ.दहावीचाही निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये, शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

सिटी प्राइड स्कूल, निगडी
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत सिटी प्राइड स्कूल, निगडीच्या दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला आहे. इयत्ता दहावी मध्ये हर्षवर्धन येवले याने ९८.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. अद्विका कणखर हिने ९७.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अहिरे सोहम, आदित्य गावडे या विद्यार्थ्यांनी ९७.२० गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. इयत्ता बारावीमध्ये सिद्धांत कुनाची याने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ऋजुता वालावलकर हिने ९५.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि अर्जव मुक्कीरवार याने ९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. विद्यालयाच्या संस्थापिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवई, मुख्याध्यापिका माया सावंत आणि उपमुख्याध्यापिका नेत्रा कुलकर्णी यांनी सर्व शिक्षकांनाबरोबर घेऊन सातत्यपूर्ण राबवलेल्या गुणवत्ता वाढीच्या उपक्रमाचे हे सुयश ठरले आहे.

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमधील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. परीक्षेला एकूण ११९ विद्यार्थी बसले होते. दहावीतील सिद्धी मावळंगकर (९६.४० टक्के) विद्यालयामध्ये प्रथम आली. आरोही सुतावानी (९५.८०), कृष्णा काळे (९५.२०), सिद्धेश सावंत (९४.४०), यश शर्मा (९४.२०) हे सर्व विद्यार्थी अव्वल ठरले. विद्यालयातील एकूण १९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. तर २९ विद्यार्थी हे ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अमित गोरखे, मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून अभ्यास कसा करता येईल, मार्गदर्शन केले.

ज्ञान संस्कार मंदिर
श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिरच्या इयत्ता दहावीच्या तुकडीने घवघवीत यश संपादन केले आहे. मंथन जैन (९६ टक्के), वेदांत साकला (९०.२०टक्के) हित शहा (८६.४० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविले. आर.अदिथ जैन (८५.४० टक्के), पार्श्व मेहता (८१.६० टक्के), जीनित जैन (७९.८० टक्के) आदींनी यश संपादन केले.

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचा सीबीएसई बोर्ड परीक्षेत इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीमध्ये गायत्री साळुंके (९४.९८ टक्के), मंदार कदम (९३.६ टक्के) तर संस्कृती काटकमवार (९२.६ टक्के) आणि निशांत मथड (९२.६ टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक प्राप्त केले. रुचिता एतिडे (९२.४ टक्के), शांभवी पिकले (९२.२ टक्के) यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक संपादन केला. तसेच १०६ विद्यार्थांपैकी ९० टक्केच्या वर ११ विद्यार्थांनी गुण संपादन केले आहे.
बारावीमध्ये शर्वरी कुलकर्णी (९४.६ टक्के), तनिष्का लोहिया (९२.८ टक्के), मानव शाह (९२.४ टक्के), सुमैय्या हिंदोळकर (९२ टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक तर रुतुज सराफ (९०.२ टक्के), शर्वरी बल्लाळ (९०.२ टक्के) यांनी संयुक्तरित्या पाचवा क्रमांक संपादन केला. एकूण ७२ विद्यार्थांपैकी ६ विद्यार्थांनी ९० टक्क्यांच्यावर गुण संपादन केले. विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस यांनी विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.

एस. बी. पाटील स्कूल
रावेत मधील पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट संचालित एस.बी.पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. एकूण १९९ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थी ९१ टक्क्यांच्यावर गुण मिळवण्यात यशस्वी झाले. ८१ ते ९० टक्के गुण मिळवण्यात ६७ विद्यार्थी यशस्वी झाले. अनिरुद्ध गुप्ता (९८.६ टक्के), धवल पाटील (९८ टक्के), मानस सानप (९७.८ टक्के), अद्विता कुरले (९७.६ टक्के), आदित्य ठोंबरे (९७.६ टक्के), हर्षवर्धन निमणकर (९६.८ टक्के) आणि शिवम फुलपगारे (९६.८ टक्के) यांनी अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळविले. हर्षवर्धन निमणकर, सायना जोशी, वेदांत घोटावडेकर, दर्शील माळी, श्रेया तोते, देष्णा नेहेते यांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) मधून १०० गुण मिळवले. अनिरुद्ध गुप्ता, चिन्मय चौधरी, अवनी बिबवे, रितिका भाटिया, त्रिपुरा मठ या विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवस्थापन (एफएमएम) या विषयात १०० गुण मिळवले. तसेच गणितात अनिरुद्ध गुप्ता, आदित्य ठोंबरे,अद्विता कुरले, धवल पाटील, हर्षवर्धन निमणकर यांनी १०० गुण मिळवले. आर्यन भोसले सामाजिक शास्त्र या विषयात १०० गुण मिळवले. यावेळी एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण ६८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वरद जयबहे (९६ टक्के) गुण मिळवून विद्यालयातून सर्वप्रथम आला. शीतल धीऊडी, जीवन माटे यांनी (९०.२० टक्के) गुण प्राप्त करून संयुक्तरित्या द्वितीय आणि समेश झगडे (८८.४० टक्के) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. जाहीर झालेल्या निकालानुसार, एकूण एका विद्यार्थ्याला ९५ टक्क्यांपेक्षा जास्त, ३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त तर १४ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT