Hukka-Parlour sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi News : ‘आयटी’नगरीतील नाइट लाइफचा धसका; अवैध धंदेही राजरोस सुरू

आयटीनगरी हिंजवडी अलीकडच्या काळात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे बदनाम होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - आयटीनगरी हिंजवडी अलीकडच्या काळात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे बदनाम होत आहे. चहूबाजूंनी असलेल्या रूफटॉप बारचा दणदणाट अन् हुल्लडबाजांमुळे मध्यरात्रीची शांतता भंग पावत आहे.

अनेक वर्षांपासून एकाचजागी ठाण मांडलेले हिंजवडी पोलिस ठाण्यातील व वाकड एसीपी कार्यालयातील पोलिस अवैध धंद्यांना हद्दपार करण्याऐवजी अभय देत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ‘आयटी’तील नाइट लाइफला ब्रेक लागणार कधी, असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.

‘आयटी’तील रस्ते मध्यरात्री बारानंतर झिंगाट झालेल्या तरुण-तरुणींच्या गर्दीने फुलतात. अद्याप ‘आयटी’ पूर्ण क्षमतेने सुरु नसताना मद्यपींचे अड्डे मात्र गर्दीने ओसंडून वाहतात. म्हाळुंगेतील व्हीटीपी व गोदरेज लेबर कॅम्प म्हणजे पोलिसांचे राखीव कुरण आहे. हद्दीच्या लांब टोकाला असल्याने येथे कोणाचे सहज लक्ष जात नाही. हॉटेल रॅडिसनमागे, लेबर कॅम्प व हिंजवडी गायरानात अनेक अवैध धंदे सुरू आहेत.

हिंजवडी ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर काही बार मध्यरात्री उशिरापर्यंत तर काही बार लपून-छापून २४ तास सुरू असतात. ठाण्याच्या मागील गल्लीत रात्रभर मद्यपींची झुंड येते असते. हॉटेल समोरून बंद दिसल्यास इतरही मार्ग उपलब्ध असतो. पबमुळे रहिवाशांची शांतता भंग पावत आहे.

मोठ्याने डीजेचा आवाज धांगडधिंगा अन आरडा-ओरड यामुळे आजूबाजूला राहणारे रहिवासी हैराण झाले आहेत. तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही. पबमध्ये धांगडधिंगा एकवेळ ठीक आहे पण ते बंद झाल्यावरसुद्धा मद्यधुंद तरुण-तरुणी रस्त्यावर राडा करतात. शुक्रवार ते रविवारपर्यंत हा त्रास नित्याचा झाला आहे.

मलिदा देणाऱ्यांना अभय

तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली होती. त्याच धर्तीवर हिंजवडीतही तथाकथित सामाजिक सुरक्षा पथक कार्यरत असून, हे पथक म्हणजे केवळ ‘गोळा-बेरीज’ करण्यासाठी असल्याची चर्चा आहे.

या पथकातील अधिकारी, कर्मचारी नाममात्र देशी मद्य विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारतात. कारवाईचा फार्स करून कर्तव्यदक्ष असल्याचे आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवतात. प्रत्यक्षात मात्र महिन्याकाठी मलिदा देणाऱ्या मोठाल्या बारचालकांना अभय दिले जाते.

‘पब’मधील आवाजासंदर्भात नियमावली असते; मात्र कोणत्या हॉटेलच्या मोठ्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होत असेल अन् तशी तक्रार असेल तर लगेच कारवाई केली जाईल, तसेच हिंजवडी हद्दीतील अशा सर्व रूफटॉप बारची तपासणी करून त्यांना समज दिली जाईल.

- डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT