पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) (PMRDA) प्रारूप विकास योजनेतील हिंजवडी नागरी विकास केंद्रात हिंजवडीसह (Hinjewadi) परिसरातील सात गावांचा (Village) समावेश आहे. त्यामुळे ही गावे पीएमआरडीएच्या हद्दीत राहणे आवश्यक असून, ती पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करणे संयुक्तिक वाटत नाही, असे पत्र पीएमआरडीएने विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे या गावांचा समावेश महापालिकेत होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. (Hinjewadi Urban Development Center should Cover Seven Villages Area PMRDA)
पिंपरी-चिंचवड शहरालगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करावीत, असा प्रस्ताव एप्रिल २०१८ मध्ये महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यातील देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे उर्वरित १० गावांबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांनी पीएमआरडीएकडे मागितला होता. त्यानुसार, महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी अहवाल पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एंटरप्रायझेस सिंगापूर बोर्डाशी सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार पीएसआरडीएसाठी संकल्पना आराखडा तयार केला आहे. त्यात नागरी विकासांतर्गत अर्थात विकास योजना नियोजन क्षेत्रात २३० गावे प्रस्तावित आहेत. त्याचे क्षेत्र एक हजार ६२४ चौरस किलोमीटर आहे. त्यात १८ नागरी विकास क्षेत्र (ग्रोथ सेंटर) प्रस्तावित आहेत. त्यांचे स्वतंत्र विकास नकाशे व प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दृष्टिक्षेपात नागरी विकास केंद्र
समाविष्ट एकूण गावे - २१
गावांचे क्षेत्र - ११७.७४ चौ. कि. मी.
हिंजवडी केंद्रातील गावे - ७
गावांचे क्षेत्र - ५४.२५ चौ. कि. मी.
महापालिकेचा प्रस्ताव
शहराच्या पश्चिमेकडील गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे व सांगवडे ही सात गावे आणि कँटोन्मेंट बोर्डाचे क्षेत्र वगळून विठ्ठलनगर व देहूगाव, दिघी व कळसजवळील टाटा कम्युनिकेशन क्षेत्र महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने फेब्रुवारी २०१८ मध्ये केला आहे. तो सरकारकडे पाठवला आहे. राज्याच्या उपसचिवांनी तो विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला आहे.
पीएमआरडीए म्हणते...
पीएमआरडीएची स्थापना मार्च २०१५ च्या अधिसूचनेनुसार झालेली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीलगतची गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण, नेरे व सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही. ही गावे पीएमआरडीएच्या हिंजवडी नागरी विकास केंद्रात समावेश होत आहेत. येथे प्रादेशिक केंद्र व माहिती तंत्रज्ञान केंद्रस्थान प्रस्तावित असून त्यानुसार नियोजन सुरू आहे. शिवाय, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचेही नियोजन आहे. त्यामुळे हिंजवडीसह सात गावे वगळल्यास संपूर्ण विकास केंद्राचे महत्त्व कमी होऊन त्यात आमूलाग्र बदल करावे लागतील. त्यामुळे ही गावे महापालिकेत समाविष्ट करणे संयुक्तिक वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.