पिंपरी : हक्का नूडल्स होणार मसाला शेवई. तसं गोबी मंच्युरिअन, चिली-चिकन, पनीर चिली, मंचाऊ सूप, शेजवान चटणी, सोया सॉस, स्प्रिंग रोल हे चायनीज खाद्यपदार्थ आता मेनू कार्डवरून हद्दपार होऊन मसालेदार, चटपटीत महाराष्ट्रीयन नाविन्यपूर्ण तडका पदार्थ खवैय्यांना मिळणार आहेत. घरगूती मसाल्यापासून बनवलेल्या व्हेज व नॉनव्हेजच्या अस्सल मेजवानीचा आनंद, जो की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात चायनीज हॉटेलसह हातगाडी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. हॉटेल व्यावसायिकांसह नेटकऱ्यांनीही आता हे पदार्थच बॅन करायचं ठरवलं आहे. चायनीज पदार्थ मेनूकार्डमधून गायब झाले तरी खवय्यांना या सर्व चवी महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये चाखायला मिळणार आहेत.
चायनीज स्टार्टरसह मेन कोर्स चिकन मंच्युरिअन, चिकन चिली, चिकन मंचाऊ, हक्का नूडल्स, शेजवान राईस, शेजवान फ्राईड राईस, चायनीज भेळ ही नावं प्रत्येक खवय्यांच्या तोंडावर रेंगाळलेली आहेत.अगदी चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या चायनीज पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. चायनीज फूड हे स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलं, तरी रस्त्यावर दिसणारं हे लाल भडक चायनीज आरोग्यास घातक आहे. शिवाय या पदार्थांमध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असल्याने हाडे ठिसूळ होऊन कॅन्सर सारख्या रोगाची घंटा सतावत असल्याचं हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातला चायनीज हातगाडी व्यवसाय सध्या पूर्णपणे नामशेष झाला आहे. शहरात भाडेतत्त्वावर राहत असलेला हा चायनीज हातगाडी चालवणारा नेपाळी व चिनी वर्ग सध्या चिंतेने ग्रासला आहे. बऱ्याच जणांनी परतीची वाट धरली आहे. सांगवीसह, पिंपरीमध्ये गल्लोगल्ली या पदार्थांची दुकाने थाटलेली आहेत. ती पूर्णपणे बंद झाली आहेत. जवळपास पाच हजारांहून अधिक चायनीजच्या हातगाड्या व हॉटेल शहरात आहेत. शहरात दिवसाकाठी प्रत्येकी पाच ते दहा हजारांची कमाई या व्यावसायिकांची आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाकड येथील हॉटेल व्यावसायिक दीपक पवार म्हणाले, "हॉटेल सुरु झाल्यानंतर सर्वांत प्रथम चायनीज पदार्थ हद्दपार होणार आहेत. शिवाय मेनूकार्डही बदलणार आहे. महाराष्ट्रीयन पदार्थांची चव कुठलाही पदार्थ घेऊ शकत नाही. सर्व हॉटेल व्यावसायिकांना आता ही नवी संधी आहे. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची. आम्ही हॉटेल व्यावसायिक हे चायनीज खाद्यपदार्थांमधून बॅन करणार हे नक्की आहे."
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आता नव्याने काय मिळणार
घरगुती काळ्या मसाल्यातले गावरान महाराष्ट्रीयन स्पेशल चिकन मटण थाळी, चिकन मटण खिमा, सागरी मालवणी फिश फ्राय, तर व्हेजमध्ये पुरणपोळी अस्सल जेवण, मासवडी, पाटवडी, पासुंदी आदी तर चायनिजच्या जागी गोबी मंच्युरिअनऐवजी फुलगोबी लटपटे पकोडे, चिली चिकनच्या जागी मिर्चीवाला मूर्ग, पनीर चिलीचं तिखा पनीर, मंचाऊ सुपला पर्यायी मनचाहा सूप, शेजवान चटणीच्या ठिकाणी लटपटी चटणी, सोया सॉसऐवजी काला पाणी, स्प्रिंग रोलऐवजी मसाला करंगी, असे गंमतीशीर खाद्यपदार्थ अस्सल महाराष्ट्रीयन गावठी मसाल्यात चाखायला मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.