Tuberculosis employees agitation sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : क्षयरोग कर्मचाऱ्यांचे ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन

क्षयरोग नियंत्रण कर्मचाऱ्यांना मात्र प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - क्षयरोग नियंत्रण कर्मचाऱ्यांना मात्र प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गेली २० वर्षे शासनाच्या तुरळक मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात असून, कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी पिंपरी महापालिकेच्या क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचायांनी ‘बेमुदत काम बंद’ सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.

‘एकच मिशन, समायोजन’, ‘समायोजन झालेच पाहिजे’, ‘या सरकारच करायच काय, लेखी आल्याशिवाय भरोसा नाय’, शासनाचा पगार पुरत नाही, रोजच्या गरजा भागत नाही,’ ‘एकच नारा, कायम करा’ अशा घोष फलक हातात घेऊन कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन व खासगी संस्थांमार्फत देशभरात जनजागृती करण्यात येत असून, क्षयरोगी रूग्णांचे प्राण वाचावेत म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा विचार शासनाने केला नाही. त्यामुळे राज्यस्तर आणि महापालिका आस्‍थापनेवर बिनशर्त समायोजन झालेच पाहिजे.

आंदोलक म्हणाले, ‘तामिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, आदी राज्यांत या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात तशा कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू नसल्याने ३ नोंव्हेबरपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ६ नोंव्हेबरला महापालिकेच्या मुख्य भवनासमोर आंदोलन करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT