independence day sakal media
पिंपरी-चिंचवड

स्वातंत्र्यदिनाचा शहरात उत्साह; संचलनासाठी मैदानावर आखणी, रोषणाई

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ध्वजस्तंभाला रंगरंगोटी, संचलनासाठी मैदानावर आखणी, विद्युत रोषणाई, मिठाई खरेदी (independence day preparation) यासह देशभक्तीपर गीतांचा कानावर पडणारा सूर, असे उत्साही वातावरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच शनिवारी (ता. १४) शहरात पाहायला मिळाले.

देशभर आज (रविवार) स्वातंत्र्यदिन साजरा होत असून या उत्सवाची शहरात शनिवारपासूनच तयारी सुरू होती. महापालिका, पोलिस आयुक्तालयासह विविध शासकीय कार्यालयात शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या तयारीची लगबग सुरू होती. ध्वजस्तंभाला रंगरंगोटी करण्यासह संचलनासाठी मैदानावर आखणीही केली. महापालिका भावनाला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. संचलनासाठी मैदानावर आखणी करण्यासह बँड पथकाचा सराव घेण्यात आला.

शाळा बंद असल्या तरी शासकीय कार्यलयांसह विविध संस्था, संघटनांकडून ध्वजवंदन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्याने शहरवासियांमध्ये उत्साह असून खरेदीसाठीही गर्दी झाली होती. ध्वज कार्यक्रमाला सफेद पोशाख डोक्यावर गांधी टोपी असावी, शर्टला छोटा ध्वज असावा, यासाठी अगोदरच तयारी केली.

शहरात पोलीस बंदोबस्त

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणांसह शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर पोलिसांची नजर राहणार आहे. गस्तही वाढवली आहे. जातीय, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर वाहन तपासणी, हॉटेल्स, लॉजचीही तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांशिवाय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांच्या मैदानाऐवजी घरात बसूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. याबाबत सर्व माध्यमांच्या शाळांना महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी सूचना दिल्या आहेत.

रक्तदान शिबिर

श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १५) रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास नायर यांनी दिली. निगडीतील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात होईल.

यशोगाथा प्रकाशन

चिंचवडगावातील यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये (आयआयएमएस) सकाळी सव्वाआठ वाजता ध्वजवंदन व यशोगाथा प्रकाशन करण्यात येणार आहे.

विविध साहित्य विक्री

शहरात अनेक ठिकाणी कागदी आणि प्लॅस्टिकचे छोटे झेंडे आणि विविध आकारातील कापडी लहान-लहान राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पिंपरीतील दुकानात तिरंगी बिल्ले, स्टिकर, कॅप, ब्रेसलेट, तिरंगी तोरण, तिरंगी बलून, तिरंगी दुपट्टा, कपाळी पट्टी आदी साहित्य दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT