Four cricket bettors found red handed Police Commissioner Krishna Prakash Pimpri news  sakal
पिंपरी-चिंचवड

Video: पिंपरीत क्रिकेटवर सट्टा; चौघांकडून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेटिंगच्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर काही मिनिटातच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राजवाडेनगर, काळेवाडी येथे शनिवारी सायंकाळी क्रिकेटवर सट्टा घेणारे चौघेजण रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून आठ मोबाइलसह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय 38, रा. काळेवाडी) रिक्की राजेश खेमचंदानी (वय 36, डीलक्स थिएटरमागे, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय 57, रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी) आणि सनी सुखेजा (रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरत अली पठाण यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारवाई करत असताना, "अंगाला हात लावायचा नाही. माझी ओळख लांबपर्यंत आहे. माझ्यावर काही कारवाई झाल्यास चांगले होणार नाही" अशी धमकी देत आरोपी गिल याने पोलिसांशी झटापट केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT