kamshet sakal
पिंपरी-चिंचवड

कामशेत : अजूनही भूस्खलनाची टांगती तलवार

नऊ गावांमधील ग्रामस्थांची भावना; दगड नमुने अहवाल प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा

कामशेत : मुसळधार पावसात भूस्खलन (landslide) होण्याच्या भीतीने आम्ही ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगतो आहे. केंद्राच्या पथकानेही गावातील दगड, खडकाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचे पुढे काय झाले याची आम्हाला कल्पना नाही. दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलनाची ही टांगती तलवार आमच्या मानेवर अशीच असल्याची भीती माऊ येथील ग्रामस्थ मच्छिंद्र जगताप यांनी केली आहे. (Kamshet Landslide still hanging sword)

तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गभालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड ही दरडप्रवण गावे आहे. केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्यांचे सर्वेक्षण केले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात तुंग आणि माऊ येथे भूस्खलन झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली.

ताजेचे पोलिस पाटील अरुण केदारी म्हणाले, ‘‘माळीण येथे भूस्खलन झाल्यानंतर मावळातील दरडप्रणव गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आमच्या ताजे गावाचा समावेश होता. आतापर्यंत शासकीय आपत्ती व्यवस्थापन समितीने दोन ते तीन वेळा गावची व डोंगराची पाहणी केली आहे. अचानक दुर्घटना घडली तर जखमी लोकांना कशा पद्धतीने प्रथम उपचार अथवा किंवा जखमी अवस्थेत असणाऱ्या लोकांना बाहेर काढले पाहिजे, याबाबत प्रशिक्षण दिले. परंतु आता एवठ्यात असे कोणतेही प्रशिक्षण झाले नाही. डोंगराजवळ असणाऱ्या घरातील कुटुंबीय पावसाळ्यात दचकून जागे होतात.’’

मालेवाडीतील शंकर मरगळे म्हणाले, ‘‘दिवसभर शेतावर काम करून दमल्यानंतर रात्रभर सतर्क राहवे लागत आहे. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने केलेल्या गावच्या पुनर्वसन पाहणीचे पुढे काय झाले. याविषयी ग्रामस्थांची नेहमी चर्चा असते. या तीन वर्षात कोणीही येऊन मार्गदर्शन अथवा सूचना दिल्या नाहीत.’’

तुंग येथे झालेल्या भूस्खलनाची तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पाहणी नुकतीच पाहणी केली आहे. नायब तहसीलदार रावसाहेब चाटे म्हणाले, ‘‘दरडप्रणव क्षेत्रातील गावांचे मंडलाधिकारी यांच्यामार्फत सद्यःस्थितीचा माहिती अहवाल घेऊन विहित नमुन्यात वरिष्ठ कार्यालयास याबाबतीत अहवाल साजरा करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT