पिंपरी-चिंचवड

सरत्या वर्षानं माणुसकी शिकवली; कामशेतमधील महिलांनी कथन केला लॉकडाउनमधील प्रसंग

रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ) : ‘‘यंदाचे वर्ष कोरोनाचा सामना करण्यात गेले. हाताला काम नव्हते की खिशात पैसे, त्यामुळे मानसिक ताणतणाव वाढत होता. कोणाला दु:ख सांगता येत नव्हते अन्‌ मदतही मागता येत नव्हती. यंदा मन मारून जगलो, पण या जगण्याने माणुसकी वाढवली. शेजाऱ्यापाजऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. माणुसकीच्या झऱ्याच्या जिवंतपणाचा ओलावा आम्ही अनुभवला. त्यामुळे कधी उपाशी झोपलो नाही,’’ असा अनुभव हातचे काम गेलेल्या ट्रक ड्रायव्हरच्या पत्नी सुमन फावडे यांनी कथन केला. असा अनुभव आलेल्या सुमन एकट्या नाहीत. मावळ तालुक्‍यातील शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या कित्येक महिलांचा हाच अनुभव आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक जणींनी आपले बरे-वाईट अनुभव सांगितले. पोटा-पाण्यासाठी परराज्य व जिल्ह्यातून येथे राहणाऱ्या भगिनी सांगत होत्या. आमचे रेशनिंग कार्ड येथे नाही, म्हणून आम्हाला गहू, तांदूळ व डाळी मिळाल्या नाहीत. मात्र, आमच्या शेजारणीला मिळालेले धान्य तिने पातेले भरून माझ्या लेकरांना दिले, ते खाऊन आम्ही हलाखीचे हे दिवस काढले. त्यामुळे महामारीच्या संकटात कधीही उपाशी झोपलो नाही, असं फावडे म्हणाल्या.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लता भालेराव यांचे पती रिक्षाचालक आहेत. त्यांनी नवीन रिक्षा घेतली अन्‌ लॉकडाउन झाले. त्यामुळे बॅंकेचे हप्ते थकले. करुणा ढमाले यांचे पती पॉलिहाऊसमध्ये कामाला आहेत, वैशाली लोळेंच्या पतीची लॉण्ड्री, अनिता शिंदेंचे पती गवंडी कामगार, हेमांगी थोरवे यांचे पती दुकानात कामाला, सविता लोळेंचे पती ड्रायव्हर, समीना शेख यांच्या पतीचे केशकर्तनालय, मीना पोटफोडे यांचे पती ड्रायव्हर, मनीषा पवार यांचे पती खासगी कंपनीत कामाला आहेत. या महिलांनी लॉकडाउनमध्ये कोणत्या प्रसंगांना सामोरे जात संसार सावरला, आर्थिक चणचणीला सामोरे जात लागलो. या वर्षाने माणुसकी शिकवली, हे या सगळ्या महिलांनी ठणकावून सांगितले. महिला बचत गटांनी आधार दिला.

रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून खाल्ले. कुठलीही खरेदी केली नाही. घरात नवरा-बायकोची भांडणे झाली, पण त्यात प्रेम वाढले. नवऱ्याच्या हातचे काम गेल्याने त्याला दुखावलं नाही. पैशांसाठी हट्ट केला नाही. उलट घरखर्च भागावा म्हणून शिवणकाम करणाऱ्या भगिनींनी मास्क शिवून विकले, भाजीपाला फळे विकली, चपात्या बनवून दिल्या.
- आरती खेंगले, कामशेत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT