Crime esakal
पिंपरी-चिंचवड

Crime News : वडिलांसह पाच जणांकडून लहान मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - वडिलांसह इतर चौघांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी तेरा वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचे वडील तसेच समाधान लवटे (वय ४०), घायतडे, नितीन हराळे (वय ३२), सागर हराळे (वय २०) यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना लवटे याने तिला पाहिले. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराबाबत तिने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, १९ मे रोजी सागर हराळे याने इमारतीच्या टेरेसवर तिच्याशी अश्लील वर्तन केले.

पीडित मुलीच्या ट्यूशन टीचरचा पती घायतडे यानेही मुलीशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला असून, पाचही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT