vanchit bahujan aghadi sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वंचित बहुजन आघाडी सर्व जागा लढवणार

आगामी वर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आगामी वर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहे, असा निर्धार आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा समिक्षा व संवाद बैठक शुक्रवारी (ता. २४) पिंपरीत झाली. त्यात ठाकूर बोलत होत्या. आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, सर्वजित बनसोडे, अनिल जाधव, महिला आघाडी उपाध्यक्षा सविता मुंढे, पश्‍चिम महाराष्ट्र समिक्षा बैठकचे समन्वयक चंद्रकांत खंडाईत, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे आदी उपस्थित होते. ठाकूर म्हणाल्या, ‘‘आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे हे कुटिल राजकारण आहे.

वंचित व शोषितांचे खरे परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही आगामी निवडणुका सर्व शंभर टक्के जागांवर लढवणार आहोत. या निवडणुका म्हणजे २०२४ मधील लोकसभेची पूर्वतयारी आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने निवडणुकांना सामोरे जावे.’’ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नऊ रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा ठराव मंजूर आहे. तो रद्द केला जावा. मात्र, महापालिका सभागृहातील विरोधक लोकहिताचा कारभार करण्याऐवजी लोकद्रोही काम करीत आहेत, अशी टीकाही ठाकूर यांनी भाजप व राष्ट्रवादीवर केली. संतोष जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Markets Crash: शेअर बाजारात पैसे का बुडत आहेत? कोण आहे बाजाराचा खरा 'विलन'?

Vastu Tips: निरोगी आरोग्य अन् यश हवयं? मग घरात 'या' ठिकाणी ठेऊ नका कचरा

Latest Maharashtra News Updates : महिला कार्यकर्त्यांच्या विनयभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला अटक

Mohammed Shami is back: मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जातोय... Ranji Trophy त कसली भारी गोलंदाजी करतोय

स्वतःपेक्षा 19 वर्षांनी लहान बिझनेसमनला डेट करतेय ही बॉलिवूड अभिनेत्री ; रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यावर नेटकरी म्हणाले..

SCROLL FOR NEXT