लोणावळा - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण पावसामुळे रविवारी ओसंडून वाहू लागले. धरण भरल्याचे समजताच नागरिकांसह पर्यटकांनी सांडव्यावर बसून भिजण्याचा आनंद घेतला. रविवारी लोणावळ्यात सकाळी आठपर्यंत ४९ मिलिमीटर, तर जूनअखेर एकूण ६०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धरणाची साठवण क्षमता ०.५० दशलक्ष घनमीटर असून, गेल्यावर्षी ते एक जुलैला भरले होते. लोणावळा, खंडाळा परिसरात पाऊस सुरू असल्याने वर्षाविहारासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, लायन्स पॉइंट, आतवण व जांभुळणे भागांत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
भुशी धरणाची साठवण क्षमता जास्त नसल्याने तीन दिवसांतच भरून वाहू लागले आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.