पिंपरी-चिंचवड

दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटन नगरी गजबजली

दिवाळीच्या सुटीनंतर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी होत आहे, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत, पर्यटनस्थळे गजबजली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - दिवाळीच्या सुटीनंतर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी होत आहे, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत, पर्यटनस्थळे गजबजली आहेत. मात्र कोरोना संकटाकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. दिवाळीची सांगता झाल्यानंतर पुणे-मुंबईतील पर्यटक  रविवारच्या सुटीचे औचित्य साधून लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत. विशेषतः मुंबईसह गुजरात येथील पर्यटकांचा भरणा आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

रविवारी येथील लायन्स पॉईंट, खंडाळा, तुंगार्ली धरण, कार्ला लेणी, श्री एकवीरा देवी मंदिर, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. काही महिन्यांपासून बंद असलेली लोणावळ्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लहान मोठे व्यवसाय, चिक्की दुकाने आता पूर्वपदावर येत आहेत. दरम्यान, पर्यटकांच्या वाहनांमुळे रविवारी राष्ट्रीय महामार्गावर किरण पेट्रोल पंप ते अपोलो गॅरेज दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणावळा शहर परिसरात झालेली कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

कोरोनाचा संसर्ग कायम आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी कोरोना रोखण्यासाठी स्वतःची काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले.

लोणावळ्यासाठी आशादायक चित्र- दिलीप गुप्ता, अध्यक्ष, लोणावळा व्यापारी संघटना

लोणावळा,खंडाळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अर्थकारण थांबल्याने सर्वांवर संकट ओढवले. पर्यटकांची पसंती मिळत असून पर्यंटकसंख्या वाढत आहे . यामुळे परिस्थिती सुरळीत होत असल्याने लोणावळ्यासाठी आशादायक वातावरण तयार होत आहे, अशी प्रतिक्रिया लोणावळा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT