dr chandrakant pulkundwar sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi News : माण गाव स्वच्छ आणि आदर्श गावाचा उत्तम नमुना - डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार

'स्वच्छता ही सेवा' हे वाक्य अनेक वर्षे आधीच खरे करून दाखवीणारी माण ग्रामपंचायत.

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - 'स्वच्छता ही सेवा' हे वाक्य अनेक वर्षे आधीच खरे करून दाखवीणारी माण ग्रामपंचायत स्वच्छ आणि आदर्श गावाचा उत्तम नमुना असल्याचे गौरोदगार काढत शासनाच्या विविध २५ अभियानांत सहभाग घेऊन पुरस्कार मिळवणाऱ्या माण गावाने पुढील वर्षी देश पातळीवर स्वच्छता अभियानातही प्रथम क्रमांक मिळवावा अशी अपेक्षा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत माणने स्वच्छता पंधरवडा अभियान राबविले. महात्मा गांधी जयंती रोजी आयोजित सांगता सोहळ्यात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, आप्पासाहेब गुजर, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, विस्तार अधिकारी एम. पी. चव्हाण, एस. टी. नवले, सरपंच अर्चना आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या ढोल लेजिम पथकाने मान्यवरांचे स्वागत झाले. विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. मोठ्या प्रकल्पांना ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर डस्टबिन देण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थी, शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा केली.

अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत प्रश्न विचारत संवाद साधला. गेल्या २५ वर्षांपासून गावाची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छतादुतांचा स्वच्छतेचे कीट देऊन सन्मान झाला. स्वच्छ माझे अंगण अभियानाचे दहा महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.

घणकचरा प्रकल्पास भूखंड मिळावा

सर्व्हे क्रमांक २१० गायरान कुरणातील पाच एकर भूखंड घनकचरा व्यवस्थापनास देण्याची मागणी ग्रामपंचायतने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे ती जागा मिळाल्यास सुमारे २५ ते ३० टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प ग्रामपंचायत उभारणार आहे. निधीचीही तरतूद केली आहे. त्यामुळे ती जागा द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांपासून साफसफाई करणाऱ्या ५० महिला-पुरुष कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाच्या जिल्हा परिषदेकडील प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली.

गाव हागणदारीमुक्त अधिक मॉडेल घोषित

ग्रामपंचायत माण व महसुली गाव भोईरवाडी दोन्ही गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल घोषित झाल्याने सरपंच अर्चना आढाव, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, उपसरपंच शशिकांत धुमाळ व सर्व सदस्यांचा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार व मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र देऊन सन्मान झाला.

यावेळी सदस्य संदीप साठे, प्रशांत पारखी, देविदास सावंत, पंडित गवारी, विजय भोसले, छाया ओझरकर, शुभांगी भोसले, रूपाली बोडके, अर्चना गवारे, युगंधरा पारखी, पांडुरंग राक्षे, अमृता हेंगडे, तुकाराम भोईर उपस्थित होते. ज्योती दवणे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT