a man built a multi model four wheeler In Pune 
पिंपरी-चिंचवड

कौतुकास्पद ! अल्पशिक्षित सलीमने बनवलेली मल्टिमाॅडेल फोर व्हिलर; एकदा पाहाच

पीतांबर लोहार

पिंपरी : स्टेअरिंग व पुढचे चाक मोटारसायकलचे, साठला( साठा) सायकलचा, इंजिन व मधले चाक स्कुटरचे, कॅरिअर व बाजूची दोन चाके हातगाडीचे अशी मल्टिमाॅडेल फोर व्हिलर अर्थात चार चाकी गाडी तुम्ही पाहिली आहे का? नाही ना? मी पाहिली. भोसरी ते निगडी स्पाइन रस्त्यावर आणि ती बनवली आहे, अल्पशिक्षित सलीम यांनी. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील गावांमध्ये फिरून ते कपडे विकण्याचा व्यवसाय करतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सलीम एक चाळीस-पंचेचाळीस वर्षांचे व्यक्तिमत्व. पंधरा वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात दिल्लीहून पिंपरी चिंचवड शहरात आलं आणि इथेच स्थायिक झालं. निगडी-रूपीनगर येथील एका छोट्याशा खोलीत त्यांचा संसार थाटला आहे. सुरवातीला शहरभर ते चालत फेरी मारून कपडे विकायचे. पण, दररोज इतकं चालणं म्हणजे एक दिव्यचं होते. पण, तरुणपणामुळे त्यांनी ओझे खांद्यावर घेऊन चालत जाण्याच्या त्रासावर मात केली. काही दिवसांनी हातगाडी घेतली. पण, ती ढकलत जास्त भागात फिरणं शक्य नव्हतं. पण, कुटुंबासाठी तो त्रासही सहन केला. काटकसर करीत दोन पैसे बचत केले. तीन चाकाची जुनी सायकल घेतली. पण, त्यावर माल मांडायचा कसा? कारण,  ग्राहकांना व्हरायटी हवी असते. शिवाय, वयही वाढत होते. तीन चाकी सायकलचे पायबंद मारणे जिकरीचे होत होते. मग एक दिवस त्यांनी जुनी रिक्षा घेतली. त्यातून फिरून कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. पण, त्यातही 'पण' आडवा आला. कारण, पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे रिक्षा परवडत नव्हती. आता काय करायचे? असा विचार नेहमी मनात यायचा. पण, ते हिम्मत हरले नाहीत. असेच एक दिवस दिल्लीला गेले. तिथे काही दिवस राहिले. या काळात एक अनोखी गाडी त्यांनी पाहिली. आणि आशाचा किरण फुलला, आपणही अशीच गाडी बनवायची आणि व्यवसाय करायचा. झालं, अनोख्या गाडीच्या विचाराने ते जणू झपाटले होते. पुन्हा निगडीत आले.

भंगारातून मोटारसायकलचे हॅंडल पुढच्या चाकासह विकत घेतले. जुन्या स्कूटरचे इंजिन मागच्या चाकासह आणले. या दोघांना जोडण्यासाठी सायकलचा साठला घरातच होता. तो जोडला. आता माल ठेवण्यासाठी कॅरियर किंवा ट्राॅली हवी होती. तीही घरातच मिळाली. जुनी हातगाडी त्यासाठी उपयोगात आली. हातगाडीचे दोन चाके व वरचा सापडा घेतला. त्याला चारही बाजूने लाकडी फळ्या ठोकल्या. ट्राॅली तयार झाली. भंगारातून अॅंगलव पत्रा आणला. अँगलचे खांब व पत्र्याचे छप्पर तयार झाले. हे सर्व एकत्रित जोडले आणि साकारली मल्टिमाॅडेल फोर व्हिलर अर्थात चार चाकी गाडी. पेट्रोलवर चालणारी. हाफकिक स्टार्ट. आणि ती करणारं व्यक्तिमत्व होतं, अल्पशिक्षित सलीम भाई. करमणुकीसाठी त्यांनी गाडीत टेपरेकॉर्डर लावला आहे. आणि आवाजासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक कर्णासुद्धा. परिस्थितीनेच जणू त्यांना शहाणपण शिकवलं आहे. कसं जगायचं, याचे धडे दिले आहेत. त्यातूनच ते प्रतिकुलतेवर मात करीत जीवन जगत आहेत. 

'सकाळ'शी बोलताना सलीम म्हणाले, ''पंधरा वर्षांपासून शहरात राहतो आहे. परिसरात फिरून कपडे विकतो आहे. पिंपरी कॅम्पातून माल घेतो, आणि पिंपरी चिंचवडसह चाकण, म्हाळुंगे, देहू परिसरात फिरून विकतो. अशी गाडी दिल्लीत पाहिली होती. करून बघितली. एक लिटर पेट्रोलमध्ये चाळीस किलोमीटर चालते, त्यामुळे परवडते. पण, कोरोनामुळे ग्राहक कमी झाले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT