CM Eknath Shinde sakal
पिंपरी-चिंचवड

CM Eknath Shinde : बोलीभाषांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध

‘विविध कला, संस्कृती व बोलीभाषांच्या समावेशातून मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे. गेल्या शंभर वर्षात नाट्यसृष्टीने अनेक चढउतार पाहिले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘विविध कला, संस्कृती व बोलीभाषांच्या समावेशातून मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे. गेल्या शंभर वर्षात नाट्यसृष्टीने अनेक चढउतार पाहिले. त्यात तावून सुलाखून तिची वाटचाल सुरू आहे. हे चढउतारच रंगभूमीच्या गतिमानतेचे लक्षण आहे,’ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात उभारलेल्या सूर्यमाला व्यासपीठावर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. स्वागताध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

गज्वी यांनी जब्बार पटेल यांच्याकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. नाट्यसंमेलनाची स्मरणिका ‘नांदी’, गज्वी यांचे आत्मकथन ‘रंगनिरंग’ यांचे यावेळी प्रकाशन झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम शंभर वर्ष करणे, केवळ मराठी माणसांच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच शक्य झाले. ओटीटी व सोशल मीडियाच्या जमान्यात प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे. मराठी रंगभूमीला आशय, विषय, नेपथ्य, सादरीकरण अशा माध्यमातून अनेक कलावंतांनी समृद्ध केले आहे. यासाठी वेगवेगळे प्रयोग होत गेले. त्यामुळे मराठी रंगभूमी ताजीतवानी राहिली आहे.’’ अजित भुरे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ’मधील उताऱ्याचे वाचन

‘सकाळ’ने शनिवारी (ता. ६) ‘शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन’ विशेष पुरवणी प्रकाशित केली. त्यातील प्रशांत दामले यांच्या ‘प्रेक्षकच आमचे मायबाप’ या लेखाचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे यांनी उताऱ्याचे वाचन केले. ते म्हणाले, ‘मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे.

त्याची तुलना चित्रपटांशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखे होईल. नाटकाच्या तिकिटाबाबत प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तिकीट काढणे म्हणजे कलावंतांचे कौतुक करणे आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT