Bribe 
पिंपरी-चिंचवड

मावळात सरकारच्या अनेक खात्यात लाचखोरीने प्रशासन झाले बदनाम

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - मावळात गेल्या काही वर्षात सरकारच्या अनेक खात्यात लाचखोरीच्या घटना उघडकीस आल्याने प्रशासन बदनाम झाले आहे. एखादे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लाखखोरीला आळा बसण्याऐवजी ती वाढतच चालल्याने व आता पोलिस व न्यायालयाच्या बाबतीतही या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. लाचखोरीची लागलेली ही कीड दूर होणार कशी असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. तालुक्‍यात गेल्या काही वर्षात महसूल खात्यातील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास विभागातील ग्रामसेवक, दुय्यम निबंधक, वीज वितरण कंपनीतील अधिकारी अशा विविध खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडले होते. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लाचखोरीला आळा बसण्याऐवजी सातत्याने या घटना घडतच आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील सद्यःस्थिती

  • पुणे व मुंबईच्या मध्यवर्ती असलेला मावळ तालुका या दोन्ही शहरातील धनिकांच्या दृष्टीने सोन्याचा तुकडा 
  • नैसर्गिक सृष्टिसौंदर्य, उत्तम हवामान, पाण्याची मुबलक उपलब्धता व मूलभूत सुविधा
  • येथील जमिनीला उद्योगधंदे तसेच धनिकांची पसंती
  • जमिनीची खरेदी विक्री हा अनेकांचा बिनभांडवली धंदा
  • स्वतःच्या नावावर जमीन नसलेले अनेक जण दलाल म्हणून कार्यरत
  • पुणे-मुंबईचे अनेक धनिक, उद्योजक, सिने अभिनेते-अभिनेत्री, राजकीय हस्ती यांच्या जमिनी

का होते लोचखोरी

  • प्रत्येक खात्यात पैसे देऊन कामे त्वरित मार्गी लावून घेण्याचा त्यांचा फंडा
  • शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीची चटक
  • केवळ महसूल खात्यातील कामासाठी नव्हे तर इतर विभागांतील कामे व प्रकरणांसाठीही दाम करी काम पध्दत रूढ
  • बदली होऊन रिकाम्या हाताने तालुक्‍यात आलेला अधिकारी जाताना ट्रकभरुन घेऊन जातो
  • बदली होऊन येण्यासाठी अधिकाऱ्यांची चढाओढ

मावळात वर्षभरात घडलेल्या घटना

  • १२ मार्च २०२० - गाव कामगार तलाठी, कार्ला-सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एक लाख रुपये
  • २९ एप्रिल २०२० - सहाय्यक पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस केंद्र, वडगाव मावळ-उर्से टोलनाक्यावर अडवलेल्या गाड्या सोडून देण्यासाठी १५ हजार रुपये
  • २५ नोव्हेंबर २०२० - दुय्यम निबंधक, लोणावळा-जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी २५ हजार रुपये
  • ८ डिसेंबर २०२० - दुय्यम निबंधक, वडगाव मावळ- नोंदणी झालेल्या दस्तावर सही शिक्के मारण्यासाठी साडेसात हजार रुपयांची लाच
  • १३ जानेवारी २०२१ - खासगी महिला, तळेगाव दाभाडे-न्यायालयातील केसचा निकाल लावून देण्यासाठी पन्नास हजारांची लाच
  • ६ मार्च २०२१ - पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल, कामशेत पोलिस स्टेशनमधील अटकेतील आरोपीला जामिनासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपये

तक्रार कशी कराल
लाच मागणारे सरकारचा पगार व एक रुपयांपासून पुढे मानधन व लाभ घेणारे लोकसेवक, लाचेसाठी मध्यस्थी करणाऱ्या खासगी व्यक्तिविरोधात नागरिक १०१६ या क्रमांकावर अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार करू शकतात. समक्ष येऊन तक्रार दाखल करू शकतात. त्यांची नावे गुप्त ठेवली जातात.

लाचखोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचे प्रमाण वाढवले आहे. लोकसेवकाविरोधात तक्रार केली तर आपले काम होणार नाही अशी लोकांना भीती असते. परंतु जे कायदेशीर आहे व कायदेशीर बाबींची सर्व पूर्तता केली आहे अशी कामे करणे हे लोकसेवकाचे कर्तव्यच आहे. जर वैयक्तिक लाभासाठी पैशाची मागणी करीत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी. कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करण्यात येईल.
 - सूरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT