लखन देवासी Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या खुनाचे कारण स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - चिखलीतील आठ वर्षीय मुलाच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले असून एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर दोन दिवसांनंतरही आरोपी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर आरोपीला अटक केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला होता. बपीलअहमद रईस लष्कर वय २६, रा. गणेश मंदिराजवळ, हरगुडे वस्ती, कुडळवाडी, चिखली, मूळ-आसाम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मण उर्फ लखन बाबूलाल देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. खेळायला जातो म्हणून लक्ष्मण रविवारी (ता. १७) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून गेला. बराच वेळानंतरही घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तरीही तो सापडत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. परिसरात कसून शोध घेत असताना घरापासून काही अंतरावरील एका पत्राशेडमध्ये लक्ष्मणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून त्याचा खून केल्याचे समोर आले.

दरम्यान, आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय व नातेवाईकांनी सोमवारी व मंगळवारीही चिखली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी कसून तपास करीत मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर कुटुंबियांनी लक्ष्मणचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, या आरोपीने एक लाखाच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले. मुलाने आरडाओरडा केल्याने आरोपीने त्याच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून त्याचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. हा आरोपी देवासी राहत असलेल्या इमारतीतच रहायला होता. चार दिवसांपूर्वीच तो दुसरीकडे रहायला गेला होता. अधिक तपास सुरू आहे.

परदेशात जाण्यासाठी लागत होते पैसे

आरोपीला परदेशात जायचे होते. त्यासाठी त्याला एक लाख वीस हजार रुपयेची गरज होती . यामुळे त्याने लक्ष्मणचे अपहरण करून एक लाख रुपये मागणार होता. मात्र, लक्ष्मणने आरडाओरडा केल्याने त्याचा खून केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT