केंद्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याने भाजपशी आघाडी असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या खासदारांपैकी तीन जणांना मंत्री म्हणून संधी दिली जाणार आहे.
पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तारात मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे उपेनेते व खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय राज्य मंत्री म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचा समावेश होणार असल्याची राजकरय वर्तुळात चर्चा आहे.
केंद्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याने भाजपशी आघाडी असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या खासदारांपैकी तीन जणांना मंत्री म्हणून संधी दिली जाणार आहे. या पैकी एक जणास कॅबिनेट व दोन जणांना केंद्रीय राज्य मंत्री पद दिले जाणार असल्याचे विश्सणीय वृत्त आहे.
श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारीवर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे ते राज्यासह देशातील राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते.
आगामी महापालिकेसाठी बळ देणार...
खासदार बारणे यांनी बाळासाहेबांची शिवसेनेला पाठींबा दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजपबरोबर आघाडी करुन लढणार व आगामी लोकसभा निवढणूकही भाजपसोबतच लढणार असे जाहिर केले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका ही एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेली महापालिका २०१७ नंतर आता दुसऱ्यांदा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजप बारणे यांना ताकद देईल, असाही एक कयास त्यांची केंद्रीय राज्य मंत्रीपदी निवड लावताना लावला जात आहे.
१२ खासदारांची मोट बांधल्याचे फळ मिळणार?
जून २०२२ मधील शिंदे यांच्या बंडानंतर १९ जुलै २०२२ रोजी शिवसेनेतील १२ खासदारांनी शिंदे यांच्या गटाला पाठींबा दिला होता. या १२ खासदारांची मोट बांधून शिंदे गटाला पाठींबा देण्यात व राहुल शेवाळे यांना लोकसभेत गटनेते पदी निवड करण्यात खासदार बारणे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्याचे फळ त्यांना मिळणार असलत्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.