Pawana Dam sakal
पिंपरी-चिंचवड

मुळा-पवना नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा; धरणांतून १० हजार क्युसेकने विसर्ग

मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पिंपरी - मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत. पवना धरणाच्या सांडव्याद्वारे शुक्रवारी दुपारी तीन वाजता आठ हजार ६०० आणि वीज निर्मिती केंद्रातून एक हजार ४००अशा दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल, असे धरण प्रमुख समीर मोरे यांनी कळविले आहे. तसेच, मुळशी धरणाच्या सांडव्यावरून दुपारी दोन वाजता २६ हजार ४०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून तो ३५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येईल, असे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी कळविले आहे.

मुळा नदीवर मुळशी धरण असून पवना नदीवर पवना धरण आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व धरणाच्या खालील बाजूस गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यापूर्वीच दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे मुळा व पवना धरणातून विसर्ग सुरू होता. बुधवारी सायंकाळपासून तो वाढविण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यात बदल संभवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन मुळशी व पवना धरणप्रमुखांनी केले आहे.

मुळा-पवना संगमावरील भाग

मुळा व पवना नद्यांचा संगम जुनी सांगवी येथे होतो. संगमावर जुनी सांगवी आहे. संगमाच्या एका बाजूला दापोडी व दुसऱ्या बाजूला पुण्यातील बोपोडी उपनगर आहे. संगमापासून पुढे नदी मुळा नावानेच आळखली जाते. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास संगमावर पाण्याचा फुगवटा होऊन त्याचा मोठा फटका मुळा नदी काटावरील जुनी सांगवीतील ममतानगर, संगमनगर, पवनानगर, मुळानगर, मधुबन सोसायटी, पिंपळे निलख, वाकड गावठाण, दापोडीतील सिद्धार्थनगर, पवारनगर, बोपखेलमधील गावठाण, रामनगर आदी भागाला बसतो.

यामुळेही वाढते पाणी

मुळा व पवना नद्यांमध्ये अनुक्रमे मुळशी व पवना धरणातून केलेला विसर्ग व धरणाच्या खालील बाजूस असलेले नाले, ओढ्यांच्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कासारसाई धरणातून सोडलेले पाणी पवना नदीला येऊन मिळते.

गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली

पवना धरण क्षेत्रात पावसाने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे. गेल्या वर्षी १६ सप्टेंबरपर्यंत धरण शंभर टक्के भरले होते. या वर्षीही शंभर टक्के भरले आहे. मात्र, गेल्या वर्षी धरण क्षेत्रात एक जून ते १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत दोन हजार ४२० मिलीमीटर पाऊस झाला होता. या वर्षी आतापर्यंत दोन हजार ५३७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११७ मिलीमीटर जास्त पाऊस झाला आहे.

मुळा नदीची पाणी पातळी वाढली असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. पात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. गाव व शहरातील नागरी प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सूचना देऊन उचित कार्यवाही करावी.

- बसवराज मुन्नोळी, धरणप्रमुख, मुळशी

पवना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सांडव्यातून आणि वीज निर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू आहे. सतत पडणारा पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा घट केली जाईल.

- समीर मोरे, धरणप्रमुख, पवना

मुळशी व पवना धरणातून विसर्ग सुरू आहे. मुळा व पवना नदी काठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. येथील नागरिकांच्या स्थलांतरानंतर पर्यायी व्यवस्था केली आहे. नद्यांच्या पात्रालगतच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

- ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका

मुळशी धरणातून शुक्रवारचा विसर्ग (क्युसेकमध्ये)

गुरुवारी रात्री - ५,६५८

मध्यरात्री १२ - १०५६०

शुक्रवारी पहाटे १ - १३,२००

सकाळी १० - १५,८४०

दुपारी १२ - २१,१२०

दुपारी २ - २६,४००

पवना धरण शुक्रवारचा विसर्ग (क्युसेकमध्ये)

शुक्रवारी सकाळपर्यंत - १,४००

सकाळी ८ - ३,५००

सकाळी १० - ४,२००

दुपारी १ - ७,८००

दुपारी २ - ८,६००

दुपारी ३ - १०,०००

दृष्टिक्षेपात पवना धरण

उंची - ६१३.२६ मीटर

पाणी साठवण क्षमता - २७२.११ घनमीटर (टीएमसी)

जीवंत पाणीसाठा - २४०.९७ घनमीटर (टीएमसी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT