Murlikant Petkar sakal
पिंपरी-चिंचवड

Murlikant Petkar : पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास! युद्धात नऊ गोळ्या लागूनही जलतरणाची जिद्द

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्रतिकूल परिस्थितीत खेळाची जपलेली आवड आणि त्यात मिळवलेले प्रावीण्य, कुटुंबाचा विरोध पत्करून गावातील यात्रेत कुस्ती स्पर्धेत घेतलेला सहभाग आणि या स्पर्धेत मिळवलेले एक आण्याचे बक्षीस. त्यानंतर, सांगली ते पुणे व तेथून सैन्यातील भरती, असा रोमांचक जीवन प्रवास पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी उलगडला.

निमित्त होते पिंपरी-चिंचवड कलाप्रेमी मंच व स्वराज ग्रुपच्यावतीने आयोजित मुरलीकांत पेटकर यांच्या गौरव सोहळ्याचे. त्यामध्ये, पेटकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. त्यावेळी विजय बोत्रे-पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, हेमंत खंडागळे, विष्णू मांजरे, मुख्य संयोजक विजय जगताप व उद्योजक विजय चौधरी आदी उपस्थित होते.

पेटकर यांनी आपल्या मुलाखतीत १९६५ च्या युद्धातील प्रसंग कथन केले.

यावेळी नऊ गोळ्या लागल्यानंतरही त्यांनी जलतरणात मिळवलेले कौशल्य ते पॅरा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यापर्यंत आपल्या आयुष्यातील सर्व टप्पे त्यांनी कथन केले. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका आधी सुशांत सिंग राजपूत करणार होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर या चित्रपटाला झालेला विलंब आणि त्यानंतर कबीर खान यांनी चित्रपट साकारण्यासाठी केलेली मेहनत यावरही ते व्यक्त झाले.

‘चंदू चॅम्पियन’ करमुक्त करावा

पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण असलेल्या मुरलीकांत पेटकर यांचे प्रेरणादायी कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने चंदू चॅम्पियन हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली. अपंगांना ऊर्जा देण्याचे काम पेटकर यांनी केले; तर आहेच मात्र जे धडधाकट आहेत, अशा सर्वांना प्रेरणा व बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे.

या शहरात १९८२ पासून त्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेने शहरातील सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही कांबळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT