मुस्लिम बांधवांनी आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे.
वाकड - शहरातील मुस्लिम बांधवांनी आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. समाजातील न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कर्तृत्वान मुस्लिम तरुणांना पुढे आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी. अशा तरुणांच्या पाठीशी आम्ही आपली ताकद उभी करून परिवर्तन घडवू असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाज बांधवांना केले
शहरातील मुस्लिम बांधवांच्या स्थानिक प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी वाकड येथिल आयोजित संवाद सभेत मार्गदर्शन करताना आंबेडकर बोलत होते. यावेळी हाजी गुलजार शेख, अमीर हमजा शेख, मौलाना अकबर मिल्ली, हाजी गुलाम रसूल, कारी इकबाल, मस्जिद प्रमुख, मौलाना, काझी, मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे त्यांनी केंद्रसरकार विरोधकांना विविध केंद्रीय यंत्रणेद्वारे संपविण्याचा प्रयत्न करीत असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर असल्याचा आरोप केला. अशावेळी राजकीय नेते स्वतःला वाचवतात की, जनतेला? हा मोठा प्रश्न आहे. अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले मुस्लिम समाज विविध क्षेत्रामधून देशाच्या विकासात योगदान देत असताना त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. शहरात शाळा, सांस्कृतिक भवन, वक्फच्या जमिनी, कब्रस्तान यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित राजकीय पक्षांनी फक्त मुस्लिमांचा व्होटबँक म्हणून वापर केला. संतोष जोगदंड, संजय ठोंबे, ऍड फारुख शेख, हाजीमलंग शेख, तहसीन खान यांचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.