Electric Bus sakal
पिंपरी-चिंचवड

Electric Bus : नव्या ‘ई बस’ ला अद्यापही ‘रेड सिग्नल’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील डेपोंमध्ये १७७ इलेक्‍ट्रिक पीएमपी बस नव्‍याने दाखल करण्याची केवळ घोषणाच झाली. प्रत्‍यक्षात मात्र एकही बस अद्याप रस्‍त्‍यावर धावताना दिसत नाहीत. या बस नसल्‍याने जुन्‍याच बस मार्गांवर धावत आहेत. बसगाड्यांची संख्या न वाढविल्‍याने प्रवाशांच्‍या गैरसोयी कमी झाल्‍या नसल्‍याचे चित्र आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पाच इलेक्‍ट्रिक पीएमपी बस डेपो कार्यान्वित आहेत. पीएमपीकडून दररोज १६०० ते १७००च्या दरम्यान बस मार्गावर सोडल्या जातात. ठेकेदारांच्या १२ वर्षे पूर्ण होत असलेल्या २६६ बस ताफ्यातून कमी केल्या जात आहेत, तर पीएमपीच्या मालकीच्या ३२७ बसला १२ वर्षे पूर्ण झाली तरी नाइलाजाने त्या मार्गावर सोडल्या जात आहेत.

जुन्या बस मार्गावर धावत असल्यामुळे रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भर उन्हात प्रवाशांना पायपीट करावी लागत असल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. त्‍यावर उपाय म्‍हणून १७७ ई-बस ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय झाला. यंदाच्या उन्हाळ्यात या ई-बसची मोठ्या प्रमाणात मागणी होती.

त्यामुळे आणखी काही बसगाड्या आणि फेऱ्या वाढाव्यात, याबाबत नुकतीच चर्चा झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील बस कमी होत असताना करार होऊनदेखील ठेकेदाराकडून या बस देण्यास उशीर केला जात आहे. त्यामुळे नाइलाजास्तव जुन्याच बस रस्त्यावर सोडल्या जात आहेत.

नवीन बसची प्रतिक्षा

‘पीएमपी’ने ई-बससाठी वेगवेगळ्या ठेकेदारांबरोबर करार केला आहे. १७७ ई-बस येणे बाकी आहे. ज्या ठेकेदाराशी ई-बसचा करार झाला आहे, त्याच ठेकेदाराने एसटी प्रशासनाशीही करार केला आहे. त्याच्याकडून एसटीला नवीन ई-बस दिल्या जात आहेत. त्‍यामुळे शहरातील ई बस डेपोला नवीन बसची प्रतिक्षाच आहे. त्याबाबत कार्यवाही होऊनदेखील बस आल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणाहून मार्ग सुरू करण्यास अडथळे येत आहेत.

ई बसबाबत करार झालेला आहे. त्‍यानुसार १७७ बस ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र आपल्‍याला बसचा पुरवठा झाला नाही. त्‍यामुळे अद्याप त्‍या बस दाखल झालेल्‍या नाहीत.

- सतीश गव्‍हाणे, मुख्य वाहतूक व्‍यवस्‍थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT