Biocng bus sakal
पिंपरी-चिंचवड

निगडी ते लोणावळा बायोसीएनजी बस

दररोज एक हजार किलो बायोसीएनजी तयार होणार असून, हा बायोसीएनजी न्यू ॲटो कॉर्नर सोमाटणे फाटा येथे ‘पीएमपी’च्या सीएनजी बसमध्ये भरला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

दररोज एक हजार किलो बायोसीएनजी तयार होणार असून, हा बायोसीएनजी न्यू ॲटो कॉर्नर सोमाटणे फाटा येथे ‘पीएमपी’च्या सीएनजी बसमध्ये भरला जाणार आहे.

पिंपरी - दररोज एक हजार किलो बायोसीएनजी तयार होणार असून, हा बायोसीएनजी न्यू ॲटो कॉर्नर सोमाटणे फाटा येथे ‘पीएमपी’च्या सीएनजी बसमध्ये भरला जाणार आहे. टाटा मोटर्स, एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन इंडिया) व आर. डी. ई (व्हेईकल ॲँड रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) यांनी बसची चाचणी घेतली असून, पर्यावरणपूरक बायोसीएनजीवर चालणाऱ्या बस या निगडी ते लोणावळा या मार्गावर धावणार आहेत, असे ‘पीएमपी’ प्रशासनाने सांगितले.

ओल्या कचऱ्यांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक ‘बायोसीएनजी’वर (सी.बी.जी) धावणाऱ्या दोन ‘पीएमपी’च्या सीएनजी बसचे उद्‍घाटन पुणे महापालिका मुख्य कार्यालयात शुक्रवारी (ता. १) आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, वाहतूक व नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्रभारी चिफ मॅकेनिकल इंजिनीअर रमेश चव्हाण, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम, इंडियन ऑईलचे जनरल मॅनेजर के.आर. रवींद्र, इंडियन ऑईलचे मंडल प्रमुख नितीन वशिष्ठ, इंडियन ऑईलचे पुणे मंडल कार्यालयाचे प्रमुख मयांक अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नुरीएल पेझरकर, नोबल एक्सचेंजच्या संचालिका श्वेता नेगी, नोबल एक्सचेंजचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन)अश्विन झांबरे, नोबल एक्सचेंजचे संस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती.

नोबल एक्सचेंज या कंपनीद्वारे पुणे शहरात गोळा झालेल्या ओल्या कचऱ्‍यांपासून तयार होणाऱ्या बायोसीएनजी बनवून तो इंडियन ऑईल यांच्या रिटेल पंपावरून पीएमपीएमएलच्या सीएनजी बसमध्ये भरला जाणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या सस्टनेबल टूवॉर्डस ॲफॉरडेबल ट्रान्सपोर्टेशन या योजनेखाली इंडियन ऑईल कंपनी भागीदारीत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT