online fraud sakal
पिंपरी-चिंचवड

Online frauds : आमिषाला भुलाल; ठगविले जाल.. अशी होते फसवणूक

वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडून तरुणीकडून तब्बल सतरा लाख रुपये उकळले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : टेलिग्राम आयडीवर लिंक पाठवून त्यावर खाते उघडण्यास भाग पाडले, टिकटिंगमध्ये पैसे गुंतविल्यास जास्त कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगून एकाकडून ऑनलाइनद्वारे तब्बल ५७ लाख रुपये उकळले, तर दुसऱ्या घटनेत अभियंता तरुणीला जॉबसाठी संधी असल्याचे सांगत तिच्या व्हाॅट्सअपवर वेगवेगळे टास्क पाठवले.

त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडून तरुणीकडून तब्बल सतरा लाख रुपये उकळले. दोन दिवसांत घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांत आमिष दाखवून दोघांना पाऊण कोटींचा गंडा घातला. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. मात्र, अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून ऑनलाइनद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. यासाठी नागरिकांनीही सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, आमिषाला भुलाल तर ठगवले जाल, अशी वेळ येऊ शकते.

चिटिंग फ्रॉडचे प्रमाण अधिक

चीटिंग फ्रॉडमध्ये जॉब फ्रॉड, लोन फ्रॉड यासह अॅप डाउनलोड करायला सांगून फसवणूक करणे, लिंक शेअर करण्यास सांगून फसवणूक या प्रकारांचा समावेश आहे. मागील वर्षी या प्रकारच्या पाच हजार ५७० तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये जॉब फ्रॉड ८०५, लोन फ्रॉड ७२५, अॅप डाउनलोड करायला सांगून फसवणूक, ६९८ तसेच लिंक शेअर करण्यास सांगून फसवणूक ८०२ या तक्रारींचा समावेश आहे.

अशी होते फसवणूक

  • केवायसी अपडेटच्या बहाण्याने बँक खात्याची गोपनीय माहिती घेणे

  • वेगवेगळ्या स्कीमसंदर्भात फोन करीत लिंक पाठवून पैसे काढणे

  • क्यूआर स्कॅन करायला लावणे

  • बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून मोबाईलवर पाठविलेली लिंक क्लिक करण्यास भाग पाडणे

  • गुंतविलेल्या रकमेवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

  • एमएसईबी, बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून फसवणूक

  • नोकरी देण्याच्या नावाखाली विविध टास्क पूर्ण करण्यास सांगून पैसे उकळणे

टेलिग्राम, व्हाॅट्सअपवर गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी कुठे विश्वास ठेवावा कुठे ठेवू नये हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ओटीपी शेअर न करणे, अनोळखी अॅप इन्स्टॉल करू नये, पैसे देण्यासाठीच क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो, घेण्यासाठी नाही, हे लक्षात घ्यावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, या प्राथमिक गोष्टी पाळल्यास फसवणूक टळू शकते.

- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT