Online Shopping sakal
पिंपरी-चिंचवड

Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग ‘जोमात’, व्यावसायिक ‘कोमात’

वेगवेगळ्या व्हरायटीज, डिस्काउंट, सेल यामुळे ग्राहकांचा वाढता कल

सकाळ वृत्तसेवा

- अश्विनी पवार

पिंपरी - ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. स्मार्टफोनचा वाढलेला वापर, विविध कॉमर्स वेबसाइटवर एका वस्तूमध्ये मिळणाऱ्या व्हरायटीज, देण्यात येणारे डिस्काउंट व सेल यामुळे ग्राहक ऑनलाइन शॉपिंगकडे वळत आहेत. मात्र, स्थानिक व्यावसायिकांना फटका बसत आहे.

वेळेचे बंधन व जलद सेवा

पुरुषांसोबतच महिलाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन काम सांभाळून घरातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे शक्य होत नाही. अशावेळी खरेदीसाठी बाहेर पडण्याऐवजी ऑर्डर देण्यास प्राधान्य दिले जाते. ग्राहकांची गरज ओळखून अनेक कंपन्यांकडून किराणा, भाज्या, दूध ऑर्डर केल्यानंतर अगदी काही तासांमध्ये घरपोच पोचविल्या जातात. ही बाब ग्राहकांच्या सोयीची असल्याने मागणीत सातत्याने वाढ होत आहे.

महासेलमध्ये खरेदीचा ट्रेंड

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, अजिओ यांसारख्या वेबसाइटवर वेळोवेळी जंबो सेल लावले जातात. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराई डोळ्यासमोर ठेऊन हे सेल लावले जात असतात. या काळात ग्राहकांचा कल ऑनलाइन बाजारातून वस्तू घेण्याकडे वाढतो. साहजिकच याचा परिणाम स्थानिक व्यावसायिक व दुकानदारांकडील विक्रीवर होतो.

एका वेबसाइटवर असंख्य पर्याय

  • कपड्यांपासून ते इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत आणि सौंदर्य प्रसाधनांपासून ते किराणा मालापर्यंत असंख्य पर्याय ई-कॉमर्सवर उपलब्ध

  • ग्राहकांची आवड, बजेट व ब्रँडनुसार अनेक वस्तू कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध

  • ग्राहकांचा घरबसल्या खरेदीकडे कल

  • वस्तू आवडली नाही तर ती परत करण्याचा किंवा बदलून आणण्याचा पर्यायही उपलब्ध

‘ऑनलाइन’मधील उलाढालीत वाढ

१० ते १५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रासारख्या कंपन्यांच्या नफ्यात दरवर्षी वाढ होत आहे. कोरोनाचा काहीकाळ सोडल्यास या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत असल्याचे आकडेवारी सांगते.

ऑनलाइन मार्केटमध्ये जेव्हा कोणताही सेल लागतो, तेव्हा ग्राहक तेथील वस्तूंच्या किमतीची तुलना दुकानातील किमतीशी करतात. ज्यामध्ये दुकानातील वस्तू महाग वाटल्या तर ऑनलाइन खरेदी केली जाते. त्यामुळे आम्हालादेखील अनेकदा वस्तूंवर सूट द्यावी लागते.

- शैलेश बोंबले, विक्रेते, सांगवी

बऱ्याचदा ऑफिसच्या कामामुळे प्रत्यक्ष खरेदीसाठी वेळ मिळत नाही. एखादी वस्तू घ्यायची असेल तर कुटुंबाचे मतही महत्त्वाचे असते, मात्र एकत्र बाहेर पडणे शक्य होत नाही. ऑनलाइन खरेदीसाठी वेळेची अडचण येत नाही.

- नीलम यादव, देहूरोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT