High Court sakal
पिंपरी-चिंचवड

नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन

पहिल्या व तिस-या सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावायची; न्यायालयाने आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (nitin landge) यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयाने आज २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

पहिल्या व तिस-या सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावायची. साक्षीदारांशी संपर्क साधायचा नाही. तपासात ढवळाढवळ करायची नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करायचे, अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायलयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद शुक्रवारी (ता. ३०) पूर्ण झाला होता. मात्र न्यायाधीशांनी अर्जावरील निकाल ३० आॅगस्टपर्यंत राखून ठेवला होता.

या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया यांना अटक करण्यात आली आहे. लांडगे यांच्यावतीने ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. गोरक्षनाथ काळे यांनी तर उर्वरित आरोपींतर्फे अ‍ॅड. विपुल दुशिंग, अ‍ॅड. कीर्ती गुजर, अ‍ॅड. संजय दळवी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच आवश्‍यक ती कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत. अर्जदार पोलिसांना तपासात मदत करायला तयार आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. या अर्जाला विरोध करताना सरकारी वकील विजय घोरपडे यांनी युक्तिवाद केली की, गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर असून तपासा दरम्यान ते १६ जण कोण आहेत हे स्पष्ट झाले आहे.

त्यांच्याकडे चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडील चौकशी होत नाही तोपर्यंत या पाच जणांना जामीनावर सोडू नये. गुन्ह्याच्या तपासी अधिका-यांना तपास करण्यासाठी पूर्ण संधी आणि वेळा दिला गेला पाहिजे. आरोपींनी सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे. त्यामुळे गुन्ह्यात कोणाचा सहभाग नाही, असे म्हणता येणार नाही. जर या पाच जणांना जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT