Prerana Sahane Sakal
पिंपरी-चिंचवड

जिद्द, चिकाटीमुळे कर्णबधिर प्रेरणा सहाणे ठरतेय रोल मॉडेल

प्रेरणा सहाणे म्हणजे जिद्द, कष्ट, कर्णबधिरतेवर मात करत व आयुष्यात आलेल्या विविध प्रसंगांना संघर्षाने तोंड देणार व्यक्तिमत्त्व.

रमेश मोरे

जुनी सांगवी - येथील मधुबन सोसायटी ही क्रीडा, संगीत, कला व साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या वास्तव्यामुळे सतत प्रकाशझोतात असते. क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रेरणा केशव सहाणे (Prerana Sahane) यासारख्या विविध क्षेत्रांत नाव कमावलेल्या दिग्गजांमुळे आपसूकच मधुबन सोसायटीचे नावही आता देशपातळीवर झळकते आहे.

प्रेरणा सहाणे म्हणजे जिद्द, कष्ट, कर्णबधिरतेवर मात करत व आयुष्यात आलेल्या विविध प्रसंगांना संघर्षाने तोंड देणार व्यक्तिमत्त्व. तरुण-तरुणींसाठी तिचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रेरणा ही सहा महिन्यांची असताना, तिला अर्धांगवायूचा झटका आला. त्यात मेंदूतील श्रवणकेंद्र पूर्णपणे निकामी झाले. त्यामुळे तिला शंभर टक्के कर्णबधिरता आली. परिणामी वाणीही गेली. यात श्रवणयंत्राचा उपयोग झाला नाही. ती आता कला शाखेच्या शेवटच्या वर्षाला आहे. तसेच, ती भरतनाट्यम नृत्याच्या विशारदपर्यंतच्या परीक्षा उत्तीर्ण आहे.

पुण्यातील संगीत गुरू शुमिता महाजन यांनी सूर, ताल ऐकू न येणाऱ्या प्रेरणाला भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. १६ वर्षे तिच्या गुरूंनी तिच्यावर अनेक प्रयोग करून अत्यंत कष्टाने तिला शिकवले. पण, एक दिवस तिच्या शरीरातच संगीत, सूर, ताल आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचे ‘अरंगेत्रम’ म्हणजे नृत्याचा पहिला ‘स्टेज शो’ करण्याचे ठरविले. पहिला कार्यक्रम २००७ मध्ये टिळक स्मारक मंदिर, पुणे या ठिकाणी एक हजार लोकांच्या उपस्थितीत झाला. गायक आणि वादकांच्या साक्षीने तिच्या एकटीचे अडीच तासांचे अरंगेत्रम सादर झाले. शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यममध्ये हा कार्यक्रम झाला. तिथून तिने आजवर संघर्ष करत कधी मागे वळून पाहिले नाही. तिने भरतनाट्यम व फ्युजन संगीतावर आधारित मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड औरंगाबादसह महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही प्रयोग केले. ३० मे २००५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे ‘नाद’ या कार्यक्रमात तिला व्यावसायिक नृत्यांगना म्हणून सादर करण्यात आले. तिने आतापर्यंत ७५पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. तिला भारत सरकारकडून ३ डिसेंबर २०१५ रोजी रोल मॉडेल या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

२००८ मध्ये डॉ. अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामार्फत संघर्ष सन्मान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा रुक्मिणी पुरस्कार, भारत प्रेरणा पुरस्कार, दिव्यांग गौरव पुरस्कार, जिद्द पुरस्कार, ब्रिलियंट अचिव्हमेंट ॲवॉर्ड टर्फ क्लब आदी ३५ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रेरणाच्या आई डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी ‘प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स’ हे तिचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. यास राज्य सरकारचा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कारही मिळालेला आहे. त्यातून अनेकांना निराशेतून बाहेर येण्याची प्रेरणा मिळते आहे, असे आई उज्ज्वला सांगतात. संगीत व गीत ऐकूच येत नसताना त्यावर मोठमोठे स्टेज शो करणे ही अत्यंत अवघड गोष्ट ती सहजतेने करते. यात तिच्या देदीप्यमान कामगिरीचा प्रवास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT