पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, निगडीत अजूनही वीजपुरवठा विस्कळीत; आयटीयन्सना मनस्ताप!

सागर शिंगटे

पिंपरी : शहरातील पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, निगडी प्राधिकरण यासारख्या भागांत अजूनही वीजपुरवठा विस्कळीत आहे. वीजपुरवठा सुरळीत झालाच तर इंटरनेट, 'वाय-फाय' सेवा मिळत नाही. वाय-फाय असेल तर वीज नाही, अशा कात्रीत 'वर्क फ्रॉम होम' करणारे आयटीयन्स सापडले आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर नोकऱ्या जाण्याची भितीही त्यांना वाटत आहे. 

शहरातील हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक आयटी कंपन्यांमधील शेकडो कर्मचारी मागील दीड ते दोन महिन्यांपासून 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरी राहून काम करत आहेत. मात्र, वीज आणि इंटरनेट सेवेच्या लपंडावामुळे हे आयटीयन्स पुरते हैराण झाले आहेत. काळेवाडी फाटा येथील र्हिदम हाउसिंग सोसायटीचे सदस्य अभिजीत गरड म्हणाले, "आमच्या सोसायटीत 80 टक्के लोक आयटीयन्स आहेत. मात्र, शुक्रवारी सुमारे 4 ते 5 तास वीज नव्हती. थोड्याच वेळापूर्वी वीज आली आहे. परंतु, वीजपुरवठा कधी खंडित होईल किंवा नाही याची खात्री नाही. काही सोसायट्यांमध्ये 24 तास वीज नव्हती. वीज आली तर इंटरनेट सेवा नसते. इंटरनेट मिळाले तर वीज नसते अशा परिस्थितीला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, आम्हाला इंग्लंड आणि अमेरिकेतील कॉल्स रद्द करावे लागले. यापुढेही काही दिवस अशी परिस्थिती राहिली तर आयटीयन्सच्या नोकऱ्या जाण्याची भिती आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निगडी प्राधिकरण येथील गजानन खैरे म्हणाले, "आमच्या डेसॉल्ट सिस्टिम कंपनीतील 100 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. गेल्या आठवडाभरापासून मला वाय-फाय आणि वीजेची समस्या जाणवत आहे. 2 ते 3 दिवसांपासून हा त्रास वाढला आहे. बिझिनेस स्काईपद्वारे कार्यालयाच्या बैठकीला हजर राहू शकतो. परंतु, इतर सर्व कामे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपद्वारेच करावी लागतात. बरेच लोक बाहेरगावी असल्याने तेथे इंटरनेटची कनेक्‍टिव्हिटी मिळत नाही.'' 

रहाटणी येथील मोहित खंडेलवाल म्हणाले, "माझे सध्या वर्क फ्रॉम होम आहे. मात्र, ट्रान्सफार्मरमध्ये आवाज झाला आहे. आमच्या गोडांबे कॉर्नर भागांत 4 तासांपासून वीज नाही. माझा बॅटरी बॅकअप जात आहे. त्यामुळे, काम कसे करावे हा प्रश्‍न पडत आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले, "पिंपरी-चिंचवडमधील वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. बहुतेक सर्व ट्रान्सफार्मर, फिडर चालू झाले आहेत. भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमध्ये काम चालू आहे. पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी येथील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सर्व्हिस लाईनवरील वैयक्तिक तक्रारी सोडविण्याचे काम चालू आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT