Pimpri Assembly Constituency 2024 sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Chichwad Assembly Election : महिलांना रोजगाराबरोबरच हवीय सुरक्षितता; गृहिणींचा नाराजीचा सूर

Pimpri Chichwad Vidhan Sabha Election 2024 : वाढत्या महागाईच्या तुलनेत 'लाडकी बहीण योजना' कमकुवत

आशा साळवी

पिंपरी : विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, समाजात वावरताना सोयी-सुविधा नसल्यामुळे गृहिणींकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. निवडणुका डोळ्‍यांसमोर ठेवून शासनाकडून महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या जातात. त्यापैकीच ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा आहे.

मात्र, खरंच अशा योजनांचा फायदा महिलांना होतो का? किती प्रमाणात? याचे उत्तर नकारार्थीच मिळाले. प्रत्येक हाताला काम हवे आणि कामाला मोल हवे. महिलांना सुरक्षा हवी. महागाईच्या तुलनेत काही शासकीय योजना कमकुवत ठरत आहेत. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी असल्यामुळे लाभ मिळत नाही, असा तक्रारींचा सूरही गृहिणींनी आळवला आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान आठवडाभरावर आले असून, या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील गृहिणींनी लोकप्रितिनधींकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत.

काय आहेत अडचणी...

  • महिलांना संरक्षण देणारे कायदे कागदावरच

  • स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा

  • प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागते

  • प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महिलांचे शोषण

  • महागाईच्या तुलनेत काही शासकीय योजना कमकुवत

काय आहेत मागण्या...

  • महिलांना संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी करा

  • महागाई आटोक्यात आणा

  • लाडकी बहीण योजनेपेक्षा हाताला

  • काम द्या

  • एकल महिलांसाठी असलेल्या योजना अमलात आणा

‘राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करतात. मात्र, प्रत्‍यक्षात गृहिणींसाठी गरजेच्या वस्तू महाग झालेल्या असतात. दरमहा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या दीड हजारात घर सांभाळणे होत नाही. त्‍यापेक्षा महिलांना स्वावलंबी बनवले पाहिजे.

- रजनी जाधव, गृहिणी अजमेरा कॉलनी

‘महिलांचे प्रश्‍न हे केवळ त्यांचे नाहीत. त्यातून समाजाचा महिलांविषयीचा दृष्टिकोन समोर येतो. अत्याचाराविरोधात महिलांनी तक्रार करायची कुठे? महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात महिला उमेदवारांनी आवाज उठवला पाहिजे. वंचित, एकल महिलांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

- अग्नेस फर्नाडिस, भोसरी

‘‘आज महिलांसाठी अनेक कायदे आहेत. मात्र, या कायद्यांविषयी लोकांना विशेषत: महिलांनाच फारशी माहिती नाही. उमेदवारांनी महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. अनेक गुन्ह्यांची सुरुवात घरातूनच होते. कायद्याचे ज्ञान असल्यास अनेक गुन्हे टळू शकतात.

- ॲड. कविता स्वामी, विधितज्ज्ञ

महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आज रात्रपाळी करणाऱ्याही अनेक महिला आहेत. अनेक ठिकाणी महिलांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. सुरक्षित आणि सुसज्ज वसतिगृहांअभावी मुलींचे होणारे हाल त्यांच्या प्रगतीतील अडथळे ठरत आहेत. त्यामुळे मुलींची सुरक्षा आणि सुविधा यांची व्यवस्था करण्याबाबतही केंद्र स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षस्तरावर महिलांनी आपली सक्षम भूमिका दाखवून महिलांचे प्रतिनिधित्व ठामपणे मांडणे गरजेचे आहे.

- सविता कदम, गृहिणी, पिंपळे सौदागर

महिलांच्या सुरक्षेबरोबरच सध्या सर्वत्रच महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होताना दिसते. प्रवासामध्ये, महामार्गावर, रेल्वे स्टेशन, बसथांबा परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा असून नसल्यासारखी असते. महामार्गावर तर भयानक परिस्थिती आहे. महिला उमेदवारांनी महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांवर आवाज उठविणे गरजेचे आहे.

- संगीता कांबळे, गृहिणी, पिंपरीगाव

‘लोकप्रतिनिधीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष लढा दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महिलांचे शोषण होतच असते. समाजात वावरताना आज मुली असुरक्षित आहेत. अगदी तीन ते चार वर्षांपासून ते साठीची महिलादेखील पुरुषी अत्याचाराला बळी पडतेय. अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

- आसावरी चाफळकर, गृहिणी, प्राधिकरण

‘लोकप्रतिनिधीने महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष लढा दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महिलांचे शोषण होतच असते. समाजात वावरताना आज मुली असुरक्षित आहेत. अगदी तीन ते चार वर्षांपासून ते साठीची महिलादेखील पुरुषी अत्याचाराला बळी पडतेय. अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

- आसावरी चाफळकर, गृहिणी, प्राधिकरण

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT