Pimpri-Chinchwad 94 percent result of 12th standard hsc result today sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराचा बारावीचा ९४.६४ टक्के निकाल

ऑफलाइन परीक्षेमुळे साडेपाच टक्क्यांनी निकाल घटला

आशा साळवी

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑफलाइन परीक्षा घेतल्यामुळे सगळ्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. मात्र इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी(ता.८) दुपारी लागला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. ‘हिप हिप हुर्रर्रर्रर्र' असा आवाज आज सगळीकडे घुमला...पिंपरी चिंचवड शहराचा ९४.६४ टक्के निकाल लागला. परंतू गतवर्षीच्या तुलनेत साडेपाच टक्क्यांनी निकाल घटला आहे. यात ९५ टक्के मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला अन् सगळीकडे एकच जोश निर्माण झाला. एकमेकांना शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यश मित्र-मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट केले. कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना हस्तांदोलन करून बारावीच्या यशाच्या शुभेच्छा दिल्या. हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते. एकूणच यंदाच्या निकालांमुळे सगळ्याच महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा तांत्रिक कारणामुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली.

त्यामुळे निकाल जूनमध्ये जाहीर झाला. तब्बल दोन वर्षानंतर यंदा शाळेच्या आवारात किंवा कॅफेत मुलांची गर्दी पाहायला मिळाली नाही. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशांसाठी खास शाळांमध्ये व्यवस्‍था केली होती.

९५.४२ टक्के मुलींनी बाजी मारली

पिंपरी चिंचवड शहरातून १७ हजार ७९६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. ९ हजार ५७१ मुले, तर ८ हजार १३३ असे एकूण १७ हजार ७०४ विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ९९५ मुले आणि ७ हजार ७६१ मुली असे मिळून १६ हजार ७५६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९५.४२ टक्के मुलींनी बाजी मारली आहे. तर ९३. ९८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशालेने आघाडी घेत १०० टक्के यश मिळविले आहेत. शहरातील ३४ महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर निकालाची ‘धूम’

तरुणाईचा हाच आनंद व जल्लोष सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर झळकला. बारावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत काहींनी आपला सेल्फीही फेसबुकवर अपलोड केला, तर काहींनी व्हॉट्‌सऍपवरून आप्तेष्ट आणि मित्र-मैत्रिणींना बारावीच्या निकालाची आनंदवार्ता दिली. सुटीसाठी गावी गेलेल्या मित्र-मैत्रिणींनी बारावीच्या निकालाची वार्ता फेसबुक, व्हॉट्‌सऍप, हाईक आणि इंस्टाग्रामवरून आपल्या मित्र-मैत्रिणींना कळविली. काहींनी पेढे वाटताना, हस्तांदोलन करताना आणि शुभेच्छा घेतानाचे छायाचित्र पोस्ट करत बारावीच्या परीक्षेत यश मिळविल्याचा आनंद साजरा केला. उत्सुकता, आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे एक वेगळेच समीकरण सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर पाहायला मिळाले.

कट्ट्यावर सेल्फी आणि भविष्याबाबत रंगल्या गप्पा

बारावी... करियरच्या स्वप्नांना पायवाट देणारा प्रवास. या प्रवासाची सुरवात बुधवारी तरुणाईच्या आयुष्यात गुणपत्रिकेची प्रिंट हाती आल्यानंतर झाली. भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या अन् करियरच्या वाटेला शोधणाऱ्या तरुणाईच्या यशाचे सेलिब्रेशन महाविद्यालयाच्या कट्ट्यावर रंगले होते. गप्पांचा फड, यशाचा सेल्फी आणि शिक्षकांनी केलेले कौतुक असे आनंदी वातावरण महाविद्यालयात पाहायला मिळाले. निकाल पाहण्यासाठी झालेली विद्यार्थ्यांची गर्दी, यशस्वी विद्यार्थ्यांची एकमेकांसोबत सेल्फी काढण्याची लागलेली लगबग, पेढे वाटणारे पालक-विद्यार्थी अन् मित्रांच्या घोळक्‍यात रंगलेल्या भविष्याच्या गप्पा अशा वातावरणात विविध महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांशी यशाचा जल्लोष सेलिब्रेट केला. काहींनी एकमेकांसोबत सेल्फी काढत, तर काहींनी मित्रांबरोबर पार्टीचा बेत आखत आपल्या यशाला सेलिब्रेशनचे रूप दिले. रात्र प्रशालेतील मुले, दृष्टिहीन विद्यार्थ्यांनीही आपल्या यशासाठी शिक्षकांचे आभार मानले. दुपारी एकनंतर विद्यार्थ्यांची गर्दी महाविद्यालयात जमायला सुरवात झाली, ती सायंकाळपर्यंत कायम होती.

सायबर कॅफेचा व्यवसाय ठप्प

बारावीचा निकाल सायबर कॅफेचालकांसाठी कमाईचा दिवस असतो. यादिवशी एकेका कॅफेचालकाची १० हजार कमाई होत असते. मात्र आता सगळ्यांकडेच मोबाईल, लॅपटॉप असल्यामुळे बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला. अनेक शाळांमध्ये संगणक आणि लॅपटॉपवर निकाल पाहण्याची सोय केली होती. त्यामुळे आज कुठल्याही कॅफेबाहेर मुलांसह पालकांची गर्दी दिसली नाही. परिणामी, सायबर कॅफे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT