पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) निकालाची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली होती. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC result) मंगळवारी (ता.३) चार वाजता जाहीर झाला. शहरातून १६४७४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहराचा एकूण निकाल ९९.८६ टक्के इतका लागला असून मुलांचा निकाल ९९.८५ टक्के, मुलींचा निकाल ९९.८७ टक्के इतका लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. (pimpri chinchawad city hsc result 99.86 percent)
करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार हा निकाल लावण्यात आला आहे. दहावी निकालाच्या वेळेस राज्य शिक्षण मंडळाची वेबसाइट वारंवार हॅंग होत होती. त्यामुळे रिझल्ट लागल्यानंतरही पुढचे चार ते पाच तास विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. परंतु, बारावीच्या निकालावेळी वेबसाइटमध्ये बिघाड न झाल्याने सर्वांनी सुस्कारा सोडला.
ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर मोबाइल, लॅपटॉपवर विद्यार्थ्यांनी घरीच निकाल पाहणे पसंत केले. त्यामुळे सायबर कॅफेमध्ये तुरळक गर्दी होती. मात्र, निकालाची प्रत घेण्यासाठी सायबर कॅफेकडे विद्यार्थी गेले. निकालानंतर मित्रमैत्रिणींनी जल्लोष केला. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. निकालानंतर लगेच कोणत्या शाखेला, कुठे प्रवेश घेणार याबाबत चर्चा रंगली. विद्यार्थ्यांनी निकालपत्राबरोबर सेल्फी काढून निकालाचा आनंद घेतला.
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला
महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी केली. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के बारांश निश्चित करण्यात आला. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले गेले.
परीक्षेस बसलेले विद्यार्थी
मुले : ८६८४
मुली : ७७९०
एकूण : १६४७४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी
मुले : ८६७१
मुली : ७७८०
एकूण : १६४५१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.