आमदार जगताप यांच्या अंत्यविधीत श्रध्दांजली वाहताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार जगताप यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न केले.
पिंपरी - अखेर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वांना चकवा दिला. तीन वर्षापुर्वी कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यांनी आजाराशी झुंज दिली. ती अपयशी ठरली व ते आपल्याला चकवा देवून निघून गेले, असे सांगताना पुणे जिल्हय्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत तब्येत बरी नसताना ते कसे मुंबईला निघाले, याची माहिती देतानाच त्यांना गहीवरुन आले व ते रडू लागले. रडता रडताच हुंदका आवरत त्यांनी आपले श्रध्दांजलीपर भाषण आवरते घेतले.
आमदार जगताप यांच्या अंत्यविधीत श्रध्दांजली वाहताना ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार जगताप यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न केले. परंतु; आपण त्यांना वाचवू शकलो नाही. शेवटी पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा. ही जमलेली गर्दि पाहून त्यांनी हे शहर उभे केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य सभा व विधानपरिषद निवडणुकीत आमदार जगताप व आमदार मुक्ता टिळक यांनी तब्येत बरी नसताना येवून मतदान केले व पक्षाप्रती निष्ठा दाखविली.
राज्यसभेला एक-एक मत गरजेचे होते. पुढील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या होत्या. विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांची तब्येत बरी नसेल तर राहू द्या, नका बोलवू त्यांना.
निवडणुका येतात आणि जातात. शेवटी माणूस महत्वाचा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकी दिवशी आमदार जगताप यांना ताप होता. सकाळी १० वाजता डॉक्टर म्हणाले ताप असताना मी त्यांना सोडणार नाही. परंतु; सकाळी ११ वाजता आमदार जगताप यांचा मला फोन आला व ते म्हणाले, ‘आता माझा ताप कमी झाला आहे मी येता.’ आणि गाडी मुंबईला निघाली, असे सांगतानाच पाटील यांना हुंदका आला. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. वहीनी व त्यांचे भाऊ शंकर जगताप यांनीही त्यांना आडविले नाही. मी त्यांना विश्वास देतो आणि संपवतो, असे म्हणत त्यांनी हुदका आवरत आपले भाषण संपविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.