pimpri chincwad sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad : मोशी ते चऱ्होली गृहप्रकल्पांची मांदियाळी

पत्नी गृहिणी आहे. स्वतःचे घर हवं म्हणून अनेक साइट बघितल्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘‘माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत. साधारण ३५ वर्षांपासून आम्ही काळेवाडीत भाडेतत्त्वाने राहत आहोत. तीन मुली व एक मुलगा असे सहा जणांचे कुटुंब आहे. पै-पाहुणे येणे-जाणे असतेच. आधी मुलांच्या शिक्षणाला मग, त्यांच्या लग्नाला प्राधान्य दिले. त्यामुळे घराचे स्वप्न मागे पडले होते. आता मुलींची लग्ने झाली आहेत.

मुलगा आयटी कंपनीत नोकरीला आहे. त्याचेही लग्न करायचे आहे. दोन वर्षांपासून घराच्या शोधात होतो. पण, परवडणारे, आमच्या बजेटमधील घर हवे होते. त्यासाठी चिखली- मोशी- चऱ्होली भागातील अनेक बांधकाम साइट पाहिल्या. अखेर जाधववाडीतील साइट पसंत पडली आणि फ्लॅट बुक केलाय. येत्या दिवाळीत फ्लॅटची चावी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं उशिरा का होईना, पण घराचं स्वप्न पूर्ण होतंय,’’ काळेवाडीतील गृहिणी नीता सांगत होत्या.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या उत्तरेकडील उपनगर चिखली आणि त्याशेजारचं, पण पुणे-नाशिक महामार्गावरचं मोशी. अडबंगनाथ महाराजांचे समाधीस्थळ असलेलं आळंदीलगतच डुडुळगाव, शहराच्या पूर्वेकडचं चऱ्होली या गावांनी आता शहरीकरणाचा मार्ग स्विकारलाय. महापालिकेत समाविष्ट होऊन पंचवीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता ही गावे कात टाकत आहेत. पूर्वी चिखली म्हटलं की भंगाराची दुकाने, मोशी म्हटलं की चाळी, शेतामधली कौलारू घरं

डुडुळगाव व चऱ्होली म्हटलं तर फुलशेती व भाजीपाला उत्पादक पट्टा, असं चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण, गेल्या काही वर्षात चारही उपनगरांनी कात टाकली आहे. गगनचुंबी इमारती असलेले व पाचशेपेक्षाही अधिक सदनिका असलेले मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या भागाचा कायापालट होतो आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत आणि मोशीपासून डुडुळगाव आळंदीपर्यंत देहू-आळंदी रस्त्यालगत नवे मार्केट उभे राहिले आहे.

जीवनावश्यक किराणा मालाच्या दुकानांसह फर्निचर मॉल्स जागोजागी आहेत. चऱ्होली फाटा ते गावापर्यंत, अगदी गावाच्या पलीकडे बुर्डेवस्ती, पठारे मळा, काळजेवाडी, वडमुखवाडी, चोविसावाडी सर्वच भागात इमारती उभ्या राहात आहेत. सराफ, कापड, सौंदर्य प्रसाधने, होम डेकोरेटर, इंटेरियर डिझाईन, वाहनांचे सुटे भाग मिळणारी दुकाने आहेत. अनेक नामांकित शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत. शिवाय, वन बीएचकेपासून फोर बीएचके पर्यंतचे मनासारखे प्रत्येकाच्या बजेटमधली घरे इथे उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेचे चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी मोशी येथील गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.

माझे ऑफिस बाणेरला आहे. सध्या चऱ्होलीत वन बीएचके रेंटवर घेऊन आई-वडिलांसह राहत आहे. पत्नी गृहिणी आहे. स्वतःचे घर हवं म्हणून अनेक साइट बघितल्या; पण कनेक्टिव्हिटीची व रस्त्यांचा विचार केल्यानंतर मोशीतील साइट पसंत पडली. गेल्या वर्षी बुकिंग केले. या वर्षी दिवाळीपूर्वी ताबा मिळण्याची शक्यता आहे. दसऱ्याला गणेशपूजन करणार आहे.

पुरुषोत्तम,

आयटी अभियंता, चऱ्होली खुर्द

स्थानाचे महत्त्व

देहू-आळंदी रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, आळंदी-पुणे पालखी मार्ग प्रशस्त आहे

एका बाजूला इंद्रायणी नदी असून निसर्गसौंदर्य आहे

नदी व देहू-आळंदी रस्त्याच्या मध्ये समांतर रस्ता, अन्य अंतर्गत रस्ते होताहेत

चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी मिळणार

चिखली आणि चऱ्होलीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

कृषी उत्पन्न उपबाजार व स्थानिक मंडईमुळे ताजा भाजीपाला

मोशीतील नागेश्वर, चिखलीतील टाळ मंदिर, डुडुळगावचे अडबंगनाथ आणि चऱ्होलीचे वाघेश्वर मंदिर धार्मिक महत्त्व

प्रस्तावित प्रकल्प

मोशीत आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारक

चिखलीत पीसीओई (पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय)

चिखलीत सत्र न्यायालय संकुल आणि न्यायाधीश निवासस्थाने

मोशी, चिखली, तळवडे, चऱ्होलीसाठी महापालिका अग्निशामक केंद्र

पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण सहा पदरीकरण, एलिवेटेड मार्ग प्रस्तावित

हिंजवडी ते नाशिक फाटा ते भोसरी ते चाकण मेट्रो प्रकल्प प्रस्तावित

अनेक बांधकाम व्यावसायिकांचे मोठमोठे गृहप्रकल्प साकारात आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT