fire sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri chinchwad : टायरला आग लागल्याने 'द्रुतगती' वर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किवळे येथे रस्त्यालगत सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या टायरला अचानक आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किवळे येथे रस्त्यालगत सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या टायरला अचानक आग लागली. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यामुळे वाहतूक मंदावल्याने या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. हा प्रकार शनिवारी घडला.

रस्त्यालगतच्या कठडयाजवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने ठीकठिकाणी टायर ठेवलेले आहेत. किवळे येथेही अशाप्रकारचे टायर ठेवले असून त्याला आग लागली. काही वेळातच परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वाहनांचा वेग मंदावला.

याबाबत पोलिसांसह अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या दोन व इतर एका गाडीच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

दरम्यान, या मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आग विझवून रस्ता असफ केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT