पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जलतरण तलावात आज (मंगळवारी) धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरीन गॅस लिक झाला. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला आहे.(Latest Marathi News)
तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्यामुळे काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे आता कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले असून संबंधित व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जाण्यात आल आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. (Marathi Tajya Batmya)
पिंपरी चिंचवडमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी आले असताना अनेकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. खोकला येऊ लागला आणि गळ्याचा त्रास होऊ लागला. जलतरण तलावाच नाही तर या परिसरात ५०० मीटर पर्यंत लोकांना हा त्रास सुरु झाला. जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला. परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाल्यानंतर परिसरातील रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे.(Latest Pune News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.