पिंपरी : पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्राने (सायन्स पार्क) 'आत्मनिर्भर' होण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने केंद्राकडून आता शैक्षणिक संस्थांच्या मागणी आणि गरजेनुसार वैज्ञानिक उपकरणे तयार करून ती पुरविली जाणार आहेत.
शहर परिसरात विज्ञान संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने सुमारे सात वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनसीएसएम) यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र विकसित करण्यात आले. या केंद्रासाठी केंद्र सरकारकडून अनेक वैज्ञानिक उपकरणे देण्यात आली. हे केंद्र आता उत्तम वैज्ञानिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून, त्याला भेट देण्यासाठी दरवर्षी अनेक शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी येत असतात. या केंद्रामध्ये विविध प्रकारचे पाच विभाग असून, महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषतः मॅकेनिकल, ऑटोमोबाईल शाखेच्या विद्यार्थ्यांकडून ऑटोमोबाईल विभागाला पसंती मिळत असते. असंख्य प्राथमिक-माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांही भेटी देत असतात.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही सीबीएसई शाळांच्या आवारात वैज्ञानिक उपकरणे बसविण्यास सुरुवात झाली आहे. इतर काही शाळा आणि महाविद्यालयांकडून स्वतःच्या आवारात विविध वैज्ञानिक उपकरणे बसवून मिळणेबाबत चौकशी होत आहे. शहर परिसरातील एका तंत्रशिक्षण संस्थेने त्यांच्या अभ्यासक्रमाच्यादृष्टीने उपयुक्त अशा 10 शास्त्रीय उपकरणांची मागणी केली आहे. त्यापैकी 8 उपकरणे देणे विज्ञान केंद्राला शक्य आहे. सध्या टाळेबंदीमुळे त्याबाबतची चर्चा थांबली आहे. मात्र, लवकरच त्यादृष्टीने, परत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"यापुढे विज्ञान केंद्राला आत्मनिर्भर बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्हाला शाळा-महाविद्यालयांकडून वैज्ञानिक उपकरणे तयार करुन मिळण्याबाबत मागणी होऊ लागली आहे. त्यानुसार विविध प्रकारची उपकरणे शाळा-महाविद्यालयांना तयार करुन देण्यावर आमचा भर राहील.''
- प्रवीण तुपे, संस्थापक-संचालक, पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र
विज्ञान केंद्रातील विभाग आणि त्यातील वैज्ञानिक उपकरणांची संख्या :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.