Pimpri-Chinchwad Sharad pawar 
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad: अजित पवारांना धक्का! 4 पदाधिकाऱ्यांसह 24 जणांनी तुतारी घेतली हाती; शरद पवारांच्या पक्षात कोणा-कोणाचा प्रवेश? वाचा नावं

24 NCP workers join sharad pawar party: ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे.

कार्तिक पुजारी

पिंपरी-चिंचवड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे.

अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे यांची अनुपस्थिति पाहायला मिळाली.

अजित पवार गटात कोणा-कोणाचा प्रवेश?

१. अजित गव्हाणे ( शहराध्यक्ष)

२. हणमंतराव भोसले (माजी महापौर)

३. वैशाली घोडेकर (माजी महापौर)

४. पंकज भालेकर ( माजी नगरसेवक)

५.प्रवीण भालेकर (माजी नगरसेवक)

६. संगीता ताम्हाणे

७. रवी आप्पा सोनवणे

८.यश माने (माजी नगरसेवक)

९. संजय नेवाळे

१०. वसंत बोराटे (माजी नगरसेवक)

११. वियजा तापकीर (माजी नगरसेवक)

१२. राहुल भोसले ( शहर कार्याध्यक्ष)

१३.समीर मासुळकर ( माजी नगरसेवक)

यांच्यासह २४ जणांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याचं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे वर्चस्व आहे. त्यांच्याशिवाय इथे काहीही होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. पण, विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दादांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली आहे. पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. त्यात विधानसभा तोंडावर आल्याने अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. शिवाय, शरद पवार गटात गेल्याने आपल्याला संधी मिळू शकेल या अपेक्षेने काहींनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT