Swimming Tank Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : शहरातील जलतरण तलाव होणार चालु

कोरोनामुळे बंद असलेले शहरातील जलतरण तलाव सुरू करावेत, असे आदेश क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी आज (ता. १) प्रशासनाला दिले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे बंद असलेले शहरातील जलतरण तलाव सुरू करावेत, असे आदेश क्रीडा सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी आज (ता. १) प्रशासनाला दिले.

क्रिडा समितीची पाक्षिक सभा कै. मधुकर पवळे सभागृहात आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. यावेळी क्रिडा समिती सदस्य रेखा दर्शीले, सदस्य शर्मिला बाबर, सदस्य राजू मिसाळ, सहाय्यक आयुक्त क्रीडा सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता क्रिडा स्थापत्य सुनील वाघुंडे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे व क्षेत्रीय कार्यालयाचे आठ क्रीडा पर्यवेक्षक व अधिकारी उपस्थित होते.

सामान्य नागरिक, खेळाडू यांच्यासाठी विविध स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धा आयोजनासाठी जलतरण तलावाची सुविधा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोनामुळे शहरातील बारा जलतरण तलाव बंद होते. त्यातील नेहरूनगर, संभाजीनगर, काटेपुरम पिंपळे गुरव व प्राधिकरण हे चार जलतरण तलाव चालू करण्यात यावेत. आठ जलतरण तलावाचे स्थापत्य व विद्युत विषयक कामे पूर्ण करून चालु करण्याच्या सूचना सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

ता. ११ ते २२ डिसेंबर दरम्यान अकरावी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडिअम येथे होणार आहे. ता. १० ते १२ डिसेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ४५ महिला पुरुष गट व ४५ वर्षावरील महिला पुरुष गट यांची स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे यावर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT