Deaf and dumb students sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : मूकबधिर विद्यार्थिनी घेताहेत ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे धडे

मुलींना कौशल्यक्षम शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विविध योजना आखल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुलींना कौशल्यक्षम शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विविध योजना आखल्या आहेत.

पिंपरी - प्रत्येक महिलेला सुंदर दिसावं, असं वाटतं. सण-समारंभ असो की, छोटेखानी कार्यक्रम. सजून-धजून गेल्यानंतर व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यासाठी ब्युटीपार्लरचे योगदान मोठे आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा कमाविण्याची संधी महिलांना उपलब्ध झाली आहे. याच संधीचं सोनं करिअरमध्ये करु पाहणाऱ्या मूकबधिर विद्यार्थिनींनी या कौशल्याभिमुख अभ्यासक्रमामध्ये उडी घेतली आहे. कासारवाडीतील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे धडे गेल्या आठ महिन्यांपासून तिघी विद्यार्थिनी घेत आहेत.

मुलींना कौशल्यक्षम शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विविध योजना आखल्या आहेत. सर्वाधिक महिलांचा कल या प्रशिक्षणाकडे असल्याचे दिसून येत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून जवळपास दीड हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआयमध्ये ११ प्रकारचे विविध कौशल्याभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटोलॉजी, फॅशन टेक्नोलॉजी, सिविंग टेक्नोलॉजी, स्टेनोग्राफी आणि सेक्रेटरिअल असिस्टंट यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत. महिला अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी या अभ्यासक्रमांची आखणी केलेली आहे.

खराळवाडीतील नेहा धोत्रे, देहूरोडमधील सुहानी जगताप, चाकणमधील आकांक्षा सोनावणे या विद्यार्थिंनींनी सध्या प्रशिक्षण घेत आहेत. दहावीनंतर त्यांना २०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. सध्या त्या हातवारे व खुणांद्वारे येणाऱ्या अडचणींवर मात करत आहेत. तिघींनाही हिंदी समजते. त्यांना नेमकं कशा पद्धतीनं संवाद साधल्यानंतर समजेल, याची माहिती त्या तिघींच्याही कुटुंबीयांनी शिक्षिकांना दिली आहे. सुरुवातीला काही दिवस कठीण गेल्यानंतर शिक्षिकांनाही त्यांची भाषा समजू लागली आहे. आधी त्यांना एक ते दोन वेळा प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागत होती. मात्र, सध्या इतर मुलींप्रमाणेच त्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणात प्रवीण झाल्या आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर बाहेर पडून त्या स्वत:चा व्यवसाय उभा करणार आहेत. याचे कौतुक ‘आयटीआय’मधील सर्व शिक्षक वर्गाला आहे.

सर्वसामान्य मुलींप्रमाणेच मूकबधिर विद्यार्थिंनी प्रशिक्षण घेत आहेत. वर्गातल्या मुलींही त्यांची धडपड पाहून त्यांना मदत करतात. सर्वांसोबत चांगली मैत्री झाली आहे. सध्या त्या प्रशिक्षण घेत असताना काही अडचण आल्यास आम्ही त्यांना कागदावर लिहून देतो. तसेच, एकमेकांना हातवारे करून सांगतो. त्यांचा संवाद समजू लागला आहे. २०१९ मध्ये देखील एका दिव्यांग महिलेने प्रशिक्षण घेतले आहे.

- वंदना चिंचवडे, शिक्षिका, आयटीआय, कासारवाडी

आकडेवारी -

वर्ष मुली प्रवेश संख्या

२०१९ : १०८

२०२० : १३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT