Medical-Treatment sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : दीड हजार कोरोना बाधितांवर मोफत उपचार

महात्मा फुले आरोग्य योजना ठरतेय गरीब कुटुंबांसाठी जीवनदायी

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दीड वर्षात १ हजार ११२ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांतील रुग्णांना जीवनदायी ठरत आहे. सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून आली. गेले काही दिवस दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येत होते. त्यामुळे कोरोनावरील उपचार घेताना काही वेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. रुग्णालयातील उपचाराचा खर्च भागवणे काही वेळा अडचणीचे ठरले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती नसल्यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांसाठी ही महात्मा फुले जनआरोग्य योजना खुली करण्याचा निर्णय २३ मे २०२० रोजी आरोग्य खात्याने घेतला होता. त्यामुळे महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळाला.

दीड वर्षात ४ हजार ४४२ दाव्यांचा (क्लेम्स) निपटारा करण्याचे काम मार्गी लावले. त्यापैकी कागदपत्रांअभावी दीड वर्षात १ हजार ११२ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत,या योजनेमुळे मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांवर कोविडच्या खर्चाचा बोजा पडू नये, या उद्देशाने शासकीय रुग्णालयात याअंतर्गत ‘कॅशलेस’ उपचार देण्यात आले.

यांनाही लागू आहे योजना

  • पिवळी, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनकार्डधारक कुटुंबे

  • बांधकाम कामगार कल्याण महामंडळातील कुटुंबे

  • गरीब, गरजू कुटुंबांना कॅशलेस उपचार सुविधा

"पात्र नसताना मोफत उपचारांची मागणी अनेकांनी केली होती. या निकषात न बसणाऱ्यांना नाकारण्यात आले. तरीही १२०० रुग्णांना कोविडचे मोफत उपचार देण्यात आले. अद्याप क्लेम्सची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेमुळे मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे शक्य होत आहे."

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रूग्णालय

"योजनेतील लाभार्थींना खासगी रुग्णालयांनी कोविडचे उपचार नाकारल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. उपचार नाकारल्यास हेल्पलाइन क्रमांक, तक्रार क्रमांक अशी कोणतीच सेवा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे गरजूंना दिलासा मिळाला नाही."

-नागेश राठोड, सामाजिक कार्यकर्ता

महिना - लाभार्थी - प्रकरणे (वर्ष २०२०)

  • जुलै -२९-१०७६

  • ऑगस्ट -१२१ -३२२

  • सप्टेंबर - २१० - ५५९

  • ऑक्टोबर -१७० -२१२

  • नोव्हेंबर -८१-३६

  • डिसेंबर - १५ - ०

महिना - लाभार्थी - प्रकरणे (वर्ष २०२१)

  • जानेवारी - ६५ - ०

  • फेब्रुवारी- १२ - ०

  • मार्च - २७ - ०

  • एप्रिल -१८४ - ०

  • मे - ११७ - २२२९

  • जून -३७ - ८

  • जुलै -१७ - ०

  • ऑगस्ट - २१ - ०

  • सप्टेंबर - ६ -०

  • (एकूण -१११२-४४४२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT