ganesh visarjan sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : लाडक्या गणरायाला भाविकांकडून निरोप

गणेशमूर्ती विसर्जनाची १०७ ठिकाणी व्यवस्था. चऱ्होली परिसरात थेट इंद्रायणी नदीत मूर्ती विसर्जन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेतर्फे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे व घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजविलेले रथ तयार केले आहेत. महापालिकेच्या बत्तीस प्रभागांसह मुळा, पवना व इंद्रायणी नदी घाट आणि प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात मूर्ती व निर्माल्य संकलनची व्यवस्था होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा स्वरात घरगुतीसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना निरोप दिला जात आहे. पिंपरी, चिंचवड सह अन्य ठिकाणी उत्साह आहे. मात्र, चऱ्होली परिसरात थेट इंद्रायणी नदीत मूर्ती विसर्जन केले जात आहे. त्यामुळे दाभाडे वस्तीतील पुलावर खूप गर्दी आहे.

विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सर्व विसर्जन घाट व हौदांवर बॅरिगेटस लावलेले होते. पोलिस बंदोबस्त होता. अनेकांनी घरीच मूर्ती विसर्जन करून महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रावर दिल्या.

मूर्ती संकलन केंद्र

सेक्टर २७ प्राधिकरण, खानदेश मित्र मंडळाजवळ काचघर चौक प्राधिकरण, पांडुरंग बुवा काळभोर सभागृहाजवळ, आकुर्डी. पिंपरी भाजी मंडई पार्किंगजवळ, एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाखाली, मदर तेरेसा उड्डाणपूल हॉटेल ईगलजवळ लिंक रोड चिंचवड, सुंदरबनजवळ सुदर्शननगर चिंचवड. पंचशील चौक किवळे, मुकाई चौक, जाधवघाट रावेत, नेटके कॅार्नर विकासनगर किवळे. प्रेमलोक पार्कजवळ, हनुमान स्वीटजवळ बिजलीनगर, चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, शिवाजी चौक वाल्हेकरवाडी, गुरूमैय्या शाळेजवळ, चिंचवडेनगर. केशवनगर घाट, चिंचवड हॅाटेल रिव्हरविव्हजवळ पवना नदीघाट, धनेश्‍वरमंदिराजवळ चिंचवडगाव. स्मशानभूमी घाट काळेवाडी, इंद्रप्रस्थ कॉलनी अयप्पा मंदिर रोड काळेवाडी, ज्योतिबा उद्यान काळेवाडी.चिखली गावठाण स्मशानभूमी घाट हॉल, मोशी इंद्रायणीनदी घाट. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मैदान भोसरी, बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळ धावडेवस्ती, महादेव मंदिरामागे चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर महादेव मंदिराजवळ गुळवेवस्ती कॉर्नर. मनपा शाळा पुनावळे, ताथवडे शाळा, मनपा शाळा वाकड चौक वाकड, मनपा शाळा भूमकर वस्ती वाकड, विनोदेवस्ती खाण. मनपा शाळा पिंपळे निलख, विद्याविनय निकेतन विद्यालय विशालनगर पिंपळे निलख, मनपा शाळा कस्पटेवस्ती वाकड. दत्त मंदिराजवळ पवनानदीलगत पिंपळे सौदागर. मनपा माध्यमिक विद्यालय जुनी इमारत पिंपळे गुरव, बीआरटीएस पार्किंग कल्पतरू सोसायटीजवळ पिंपळेगुरव, बुद्धविहाराजवळ सृष्टी चौक पिंपळे गुरव, रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव.

मोशी गावठाण कमानीजवळ, चऱ्होली घाटाजवळ इंद्रायणी नदी, अलंकापूरम तापकीर चौक वडमुखवाडी, डुडुळगाव घाट. डोळस मैदान दिघी गावठाण, भारतमातानगर दिघी. सखूबाई गवळी उद्यानाजवळ भोसरी, डॉ. आंबेडकर उद्यान भोसरी, गंगोत्री पार्क. बापूजी बुवा चौक भोसरी, पीएमटी चौक भोसरी, अग्निशमन केंद्राजवळ भोसरी, पीसीएमटी चौक गव्हाणेवस्ती भोसरी. इंद्रप्रस्थ गार्डनजवळ पाटीलनगर चिखली गावठाण, पूर्णानगर खाण, मनपा शाळा म्हेत्रे वस्ती. एकता चौक रुपीनगर, तळवडे-निघोजे पुलाजवळ तळवडे, मनपा शाळेजवळ तळवडे गावठाण, सहयोगनगर गवळीशाळा रुपीनगर, टॉवरलाइन तुळजाभवानी मंदिर ताम्हाणेवस्ती. प्रबोधनकार ठाकरे मैदान यमुनानगर, मधुकरराव पवळे क्रीडांगण निगडी.

लोहमार्ग पोलिस वसाहत कृष्णानगर. डीलक्स चौक पिंपरी, वैभवनगर सोसायटी बाजूची जागा पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे. थेरगाव गावठाण पोलिस चौकीमागे, कैलासनगर बहुउद्देशीय इमारतीसमोर, बारणे कॅार्नर पवारनगर चौक, केजूदेवी घाट दत्तनगर थेरगाव, स. न. २२ खेळाचे मैदानासमोर बनदेवनगर, गणेशनगर गणपती मंदिरासमोर थेरगाव, संतोष मंगल कार्यालयासमोर संतोषनगर थेरगाव. छत्रपती चौक कुणाल हॉटेल रस्ता रहाटणी, महादेव मंदिर रहाटणी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मनपा शाळेजवळ रहाटणी. ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी, एपीजे अब्दुल कलाम उद्यान महेशनगर, आरोग्य कार्यालय गोल मंडई संततुकारामनगर, बी. डी. किल्लेदार उद्यान वल्लभनगर. मीनाताई ठाकरे शाळा फुगेवाडी, हुतात्मा भगतसिंग विद्यालय दापोडी, मनपा पाण्याची टाकी आवार गणेशनगर दापोडी. बॅडमिंटन हॉल पीडब्ल्यूडी ग्राउंड सांगवी, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल पिंपळे गुरव, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, मनपा शाळा पिंपळे गुरव. अहिल्यादेवी होळकर शाळा जुनी सांगवी, बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव जुनी सांगवी, मल्हार गार्डन हॉल नवी सांगवी, बालाजी लॉन्स मुळारोड जुनी सांगवी. आदी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र होती.

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला... अशा घोषणा देत नदी घाटावरील महापालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर आपल्या मूर्ती जमा करत आहेत. मात्र, चऱ्होली परिसरात थेट इंद्रायणी नदीत मूर्ती विसर्जन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT