उषा ढोरे  Sakal
पिंपरी-चिंचवड

नावीन्यपूर्ण कौशल्यासोबत विद्यार्थ्यांनी जुळवून घेतले पाहिजे : उषा ढोरे

बदलत्या काळामध्ये तरुणांनी वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन नावीन्यपूर्ण कौशल्यासोबत विद्यार्थ्यांनी जुळवून घेतले पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘बदलत्या काळामध्ये तरुणांनी वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन नावीन्यपूर्ण कौशल्यासोबत विद्यार्थ्यांनी जुळवून घेतले पाहिजे, ’’ असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‍पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यामध्ये “स्कील डेव्हलपमेंट” अंतर्गत उपक्रम सुरु करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाच्या पहिल्या बॅचच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमप्रसंगी महापौर ढोरे बोलत होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे संचालक प्रदीप कुमार भार्गव, अतिरिक्त आयुक्त (२) जितेंद्र वाघ,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, प्राचार्य शश‍िकांत पाटील उपस्थ‍ित होते.

महापौर पुढे म्हणाल्या, ‘‘स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून उपक्रमाद्वारे शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी नवनवीन कौशल्ये उपलब्ध करून देण्यात हा उपक्रम एकमेव ठरणार आहे.’’

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘‘आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असून यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टीक) द्वारे सुरु केलेला हा उपक्रम एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. या अभ्यासक्रमामध्ये (SAP Careers ABAP), (SAP Careers MM), (Microsoft Cloud Admin), (Linux Administration) या चार कोर्सचा समावेश आहे. हे सर्व कोर्स शहरातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात उपलब्ध केले आहेत.’’

असा असेल कोर्स

महापालिका आणि पुणे विद्यापीठ यांच्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या कोर्स फी मध्ये ७०.३०या प्रमाणात हिस्सा असणार आहे. खासगी संस्थांकडून SAP Careers MM या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी ३ लाख २५ हजार इतके शुल्क आकारले जाते. परंतु, महापालिका आणि पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांकडून ४७ हजार २०० इतके शुल्क असेल. हा कोर्स २०० तासिकांचा आहे. या कोर्स साठी २६ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून पुणे विद्यापीठामार्फत या अभ्यासक्रमाची १८ विद्यार्थ्यांसाठीची पहिली बॅच सुरू केली आहे. ऑनलाइन – ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाइटवर उपलब्ध केली आहे.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतलेला आहे. “इंडस्ट्री ४.०” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन” सेंटर स्थापन केले आहे. आगामी काळात हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच “गेम चेंजर” ठरतील. या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक करणे गरजेचे आहे.’’ दरम्यान, कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT