teachers google
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ५६ शाळांना मिळाले मुख्याध्यापक; शिक्षकांना पदोन्नती

पिंपरी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तीन वर्षापासून रखडली होती. याबाबत वारंवार शिक्षक संघटनांनी आवाज उठवला होता.

आशा साळवी

पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया तीन वर्षापासून रखडली होती. याबाबत वारंवार शिक्षक संघटनांनी आवाज उठवला होता. विविध संघटनांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. पिंपरी महापालिकेच्या शाळांना अखेर मुख्याध्यापक मिळाले आहेत. बुधवारी खुल्या संवर्गातील ५६ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या विविध संवर्गातील शिक्षकांची मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया २०१९पासून रखडली होती. या प्रक्रियेत काही त्रुटी असल्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली होती. मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त होती. काही शाळांमध्ये शिक्षक काम सांभाळून मुख्याध्यापकांची जबाबदारी पेलवत होते. मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतीक्षेत ५ जण निवृत्त झाले आहेत. दोघांचा कोविडमुळे मृत्यू झाला. त्यामुळे पदवीधर शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या शिक्षक संघटनांनी अनेकवेळा मागणी केली होती. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची संघटनेने भेट घेतली होती. सेवा ज्येष्ठता यादीनुसार संवर्गातील ५६ शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती यावेळी देण्यात आली. प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची १११ पदे मंजूर होती. ही पदे रोस्टर न अन्य तांत्रिक अडचणींमुळे २०१९ पासून रिक्त होती. त्यापैकी ५६ पदे खुल्या संवर्गातील भरण्यात आली. तसेच आरक्षणाची न्यायप्रविष्ठ बाबीमुळे विविध संवर्गातील शिक्षकांना बढती देणे अद्याप राहिल्याचे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून मुख्याध्यापक नसलेल्या पिंपरी महापालिकेच्या शाळांना अखेर मुख्याध्यापक मिळाले आहेत. ५६ उपशिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमासाठी ४७, उर्दू माध्यमासाठी ७, हिंदी माध्यमासाठी २ मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान ५२ शाळांना मुख्याध्यापकच नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच शाळेच्या कामगिरीवरही परिणाम होत होता. अखेरीस ५६ उपशिक्षकांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याध्यापकांची पदे भरल्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारात आणखी सुसुत्रता येणार असल्याचे शिक्षक परिषदेचे सदस्य नथूराम मादगुडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंद्यात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या CEC बैठकीसाठी AICC मुख्यालयात दाखल

Maruti Suzuki Alto K10 : परदेशात देखील हवा 'लॉर्ड' अल्टोचीच! एक महिन्यात लाखो कार निर्यात, मोडले सगळे विक्रम

Ashti Assembly Election : जागावाटपाचे ठरत नसेल तर तिन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी द्या - सुरेश धस

SCROLL FOR NEXT