पिंपरी - लॉकडाउनची (Lckdown) काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी (Nakabandi) केल्याचे पोलिसांकडून (Police) सांगितले जाते. मात्र, नाकाबंदीच्या ठिकाणी एकही पोलिस दिसून येत नाही, तसेच तेथील तंबूही रिकामे (Empty Tent) पडले आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांचा वावर वाढला आहे. (Police Nakabandi Tent Empty in Pimpri Chinchwad)
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन लागू केला असून, आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या १३ एंट्री पॉइंटवर व शहरात महत्त्वाच्या ३६ ठिकाणी नाकाबंदी केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला काही दिवस नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस हजर असायचे. नागरिकांना थांबवून चौकशी केल्यानंतरच सोडले जायचे. मात्र, आता पोलिस दिसून येत नाहीत. बॅरिकेड अस्ताव्यस्त पडले आहेत. तेथील तंबूही रिकामे पडले असून, काही ठिकाणच्या तंबू व मंडपाची पडझड झाली आहे.
दरम्यान, नाकाबंदीवर पोलिस नसल्याचे नागरिकांना माहीत झाले असल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडू लागले आहेत. यामुळे रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.
सोमवारची नाकाबंदी...
तळवडे, कॅनबे चौक - बॅरिकेड अस्ताव्यस्त झाले आहेत. तेथे उभारलेला तंबू दिसला नाही. पोलिसही हजर नव्हते.
निगडी, त्रिवेणीनगर चौक - मंडपात एक वॉर्डन बसलेले होते. मात्र, एकही पोलिस नव्हते. बॅरिकेड हटविल्याने रस्ता मोकळाच आहे.
चिंचवड, थरमॅक्स चौक - चौकात एकही पोलिस कर्मचारी नव्हते. मंडप रिकामाच पडला होता. यासह तंबूही रिकामाच असून तंबू एका बाजूला वाकला आहे. बॅरिकेड अस्ताव्यस्त होते.
थेरगाव, नदी पुलाजवळ - बॅरिकेड हटविले असून, नाकाबंदीच्या ठिकाणी एकही पोलिस नव्हते. मंडपही रिकामा होता.
पोलिस रेकॉर्डनुसार नाकाबंदी...
आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या १३ एंट्री पॉइंटवर नाकाबंदी
आयुक्तालयांतर्गत महत्त्वाच्या ३६ ठिकाणी नाकाबंदी
नाकाबंदीबाबत प्रश्नचिन्ह?
अपहरण व दोन खुनी हल्ल्याचे गुन्हे दाखल असलेला आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ त्याच्या साथीदारांसह घटनेनंतर पसार झाला. त्यांना पंधरा दिवसांनी पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली. दरम्यान, नाकाबंदी असताना हे आरोपी शहराबाहेर कसे पडले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या एंट्री पॉइंटची नाकाबंदी कायम असते. येथे वाहनांची तपासणी करूनच वाहने सोडली जात आहेत. अंतर्गत नाकाबंदी वेळोवेळी बदलली जाते. या सरप्राईज नाकाबंदीत तपासणीदरम्यान अनेक जण सापडतात. त्यामुळे नाकाबंदीचा पॉइंट असला, तरी तेथे सतत तपासणी न करता ‘सरप्राईज’ पद्धतीने तपासणी केली जाते. यासह ठिकाणेही बदलली जातात.
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.